लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सध्या एकही कोरोना रुग्ण नसून जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याच दृष्टीने बाहेरील राज्य आणि विदेशातून येणाऱ्या नागरिकांवर बारीक नजर ठेवली जात असून त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळेच विदेशातून परतलेल्या गोंदिया येथील चार नागरिकांना जलाराम लॉन येथे ठेवण्यात आले आहे.देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासन, आरोग विभाग आणि पोलीस यंत्रणेला यश आले आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्येच राहावा यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच अशांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६३ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.यापैकी ३४७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. सध्या स्थितीत गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील आयसोलेशन कक्षात ४६ व्यक्ती उपचार घेत आहेत. तर सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात ५२ जण उपचार घेत आहेत. यात चांदोरी ४, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, उपकेंद्र बिरसी ७, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा ८, शासकीय आश्रमशाळा इळदा २६ आणि जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४ असे एकूण ५२ जणांचा समावेश आहे.
विदेशातून आलेले चार नागरिक लॉनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 5:00 AM
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासन, आरोग विभाग आणि पोलीस यंत्रणेला यश आले आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्येच राहावा यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
ठळक मुद्दे३४७ जणांचे नमुने निगेटिव्ह । ४६ जण आयसोलेशन कक्षात