आमगाव : तालुक्यातील फुक्कीमेटा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीशी लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फुक्कीमेटा येथील शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. या पाच शिक्षकी शाळेत वर्ग तिसरीमध्ये विद्यार्थ्याची एकूण संख्या १६ असून यात सहा विद्यार्थिनी आहेत. शाळेतील वर्गाची जवाबदारी शिक्षक रमेश जैयपाल पटले याच्याकडे देण्यात आली होती. वर्गातील मुलांना सोडून उर्वरीत सहाही मुलींना वर्गशिक्षक रमेश पटले हा शाळा सुटल्यावरही अतिरीक्त वेळ देत असल्याची माहिती पुढे आली. शाळेत विद्यार्थिनींना थांबवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करण्याचे धाडस त्याने पुढे केले होते. या कृत्याला विद्यार्थिनींनी घाबरून निमुटपणे सहन केले. त्यामुळे त्या शिक्षकाचा लैंगिक अत्याचार वाढत गेला. या मुलींनी वाढत्या लैंगिक अत्याचाराला समोर होत काहींनी आपल्या आईकडे याची तक्रार केली. त्यामुळे शाळेतील त्या विद्यार्थिनींशी चालत असलेले लैंगिक अत्याचाराचे बिंग पुढे आले. मागील १५ दिवसांपासून चालत असलेले कृत्य विद्यार्थिनींनी पालकांना सांगीतल्यावर समोर आले. पालक व नागरिकांनी शनिवारी (दि.२) शाळेवर धाव घेऊन शिक्षकाला घेराव करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्या शिक्षकाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अनेक तत्थ पुढे येणार अशी माहिती आहे.(शहर प्रतिनिधी)शाळेतील इतर शिक्षकांवर ताशेरे ४शाळेत कार्यरत अन्य शिक्षकही या प्रकरणात सामील असल्याची शंका वर्तविण्यात आली आहे. विद्याथर््िानींशी लैंगिक चाळे करण्यात या शिक्षकांनी किती भूमिका घेतली याची चौकशी आवश्यक असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. त्यामुळे इतरही शिक्षकांवर ताशेरे ओढले जात आहे.
‘त्या’ शिक्षकाला चार दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: April 04, 2016 5:07 AM