शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

भरधाव मेटाडोरच्या धडकेत चौघे जखमी

By admin | Published: July 12, 2017 2:22 AM

भरधाव वेगात असलेल्या मेटाडोरने वेगवेगळ्या स्थानांवर दुचाकींना दिलेल्या धडकेत चौघे जखमी झाले.

गोरठा व किडंगीपार येथील घटना : चालक वाहन सोडून पसार लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : भरधाव वेगात असलेल्या मेटाडोरने वेगवेगळ्या स्थानांवर दुचाकींना दिलेल्या धडकेत चौघे जखमी झाले. आमगाव-गोंदिया मार्गावरील ग्राम गोरठा व किडंगीपार येथे मंगळवारी (दि.११) दुपारी २ वाजता दरम्यान ही घटना घडली. माहितीनुसार, गोंदियाहून आमगावकडे भरधाव वेगात मेटाडोर क्रमांक एमएच १६/ एवाय ९२७ येत होता. तर गोरठाहून बोथलीकडे जात असताना कमल खोटेले (रा.गोंदिया) व पत्नी कविता यांच्या नवीन दुचाकीला मेटाडोरने धडक मारली. यात कमल यांचा पाय फॅ्रक्चर झाला व कविता गंभीर जखमी झाल्या. या अपघाताने घाबरलेल्या मेटाडोर चालकाने आणखी भरधाव वेगात वाहन चालविले व पुढे ग्राम किडंगीपार येथे साई समर्थ रेस्टॉरेंट समोर दुचाकी क्रमांक एमएच ३५/टी ११६५ ला धडक मारली. येथे दुचाकीस्वार रूपेश भरतलाल बिसने (२२) यांचाही पाय फ्रॅक्चर झाला. तर इंदू किशनलाल बिसने (२१,रा.कातुर्ली) जखमी झाली. दोघे भाऊ-बहीण कातुर्ली या आपल्या गावी जात होते. या अपघातानंतर मात्र चालक मेटाडोर सोडून पसार झाला. सदर मेटाडोर अंकीत जैन नामक व्यक्तीचा असून चालकाचे नाव नेतराम गेडाम असून तो किकरीपार निवासी असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही सामाजीक कार्यकर्त्यांनी १०८ क्रमांकावरून रूग्णवाहिकेची मागणी केली. मात्र सुमारे ४५ मिनीटे रूग्णवाहिका घटनास्थळा पोहोचली नव्हती. यामुळे जखमींना खाजगी वाहनातून गोंदियाच्या जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती. पोलीस तपास करीत आहे.