लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा लागला असून यामध्ये चार हजार १६० मतदारांना रिंगणात आपले भाग्य आजमाविणाऱ्या ६४ उमेदवारांपैकी एकही उमेदवार रुचला नसल्याचे दिसून आले. हेच कारण आहे की, मतदान करताना या मतदारांनी नोटाला पसंती दिल्याचे निकालातून दिसले. विशेष म्हणजे, नोटाला सर्वाधिक पसंती दर्शविणारे एक हजार ४४१ मतदार गोंदिया विधानसभा मतदारसंघातील आहेत.
निवडणूक आयोगाने ज्या मतदारांना एकही उमेदवार पसंतीस पडलेला नाही अशांना 'नोटा' हा पर्याय मतदान यंत्रावर उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाचा मोठ्या प्रमाणात उपयोग मतदार करीत असल्याचेही निवडणुकीत दिसून येते. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि. २३) लागला असून यामध्ये जिल्ह्यातील तब्बल चार हजार १६० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली असल्याचे दिसले.
यामध्ये अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात ८०१ मतदारांनी, तिरोडा मतदारसंघात ७२४ मतदारांनी, गोंदिया मतदारसंघात सर्वाधिक एक हजार ४४१ मतदारांनी तर आमगाव विधानसभा मतदारसंघात एक हजार १९४ मतदारांनी नोटा या पर्यायाची निवड केली आहे.
२०१९ च्या तुलनेत दिसली घट यंदा जिल्ह्यात जेथे चार हजार १६० मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. तेथेच मात्र सन २०१९ मध्ये ही संख्या सात हजार ९९ एवढी होती. म्हणजेच, यंदाची आकडेवारी बघता जिल्ह्यात नोटाला पसंती दर्शविणाऱ्या मतदारांची संख्या घटली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, सन २०१९ च्या निवडणुकीत अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक दोन हजार २७ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली होती.
उमेदवारांनाही मिळाली नाहीत एवढी मतेयंदाच्या निवडणुकीत तब्बल चार हजार १६० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली आहे. विशेष म्हणजे, पक्ष व अपक्ष उमेदवारांनाही एवढी मते मिळाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, यंदा तब्बल ४० उमेदवारांना एक हजारच्या आतच मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे मात्र चार हजार १६० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविणे ही मात्र आश्चर्याची बाब आहे.
मतदार संघनिहाय नोटाचा तक्ता मतदारसंघ २०२४ २०१९ अर्जुनी-मोरगाव ८०१ २०२७तिरोडा ७२४ १८४१ गोंदिया १४४१ १८५२ आमगाव ११९४ १३७९ एकूण ४१६० ७०९९