जिल्ह्यात गुरुवारी (दि.२०) ५१० बाधितांनी कोरोनावर मात केली तर ९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. रुग्ण संख्येत घट होत असून मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत घट झाली असून मात बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने पॉझिटिव्हीटी रेट ३.९३ टक्क्यांवर आला आहे. ही जिल्हावासीयांसाठी निश्चित दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १४९४२३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२३८८३ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन करण्यात येत आहे. यातंर्गत १४८९२२ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १२८२४३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९८९३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ३७३८६ जणांनी मात केली आहे. सद्यस्थितीत १८५२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १२०४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
....
२ लाख १६ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून काेरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. यातंर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १६ हजार २५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे.
......
२४९२ जणांची चाचणी ९८ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत आहे. बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे चाचण्यांवरुन सुध्दा दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने एकूण १७६६ आरटीपीसीआर आणि ७२६ रॅपिड अँटिजन अशा एकूण २४९२ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९८ जण पॉझिटिव्ह आले. गुरुवारचा पॉझिटिव्हीटी रेट ३.९३ टक्के होता.
..............