सौंदड : रविवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सुटी असल्याने याचा फायदा घेत रेतीचा उपसा करण्याचा सपाटा सुरू करून ती चोरून नेणाऱ्यांचे चार ट्रक महसूल विभागाच्या सतर्कपणामुळे पकडल्या गेले. पिपरी घाटावरून ही रेती चोरी सुरू होती. रेती तस्कर अधिकाऱ्यांच्या सुटीचा फायदा उचलण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. मात्र याची जाणवी असल्याने सौंदड येथील तलाठी एस.एम. पिंपळे यांनी पिपरी घाटावरून रेती भरत असलेला मनोज कापगते रा.खोबा यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच ३५/जी-२६२९) तसेच तलाठी एस.के.कापसे यांनी मुन्ना वरकडे रा. बकीटोला (गोंगले) यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच ३५/जी-६२३२) नवीन स्वराज कंपनीचा नंबरप्लेट नसलेला व मनोज अग्रवाल यांच्या मालकीचा ट्रॅक्टर पकडला. तसेच मंडळ अधिकारी आर.एल. रहांगडाले रा.डव्वा यांनी दादाजी परशुरामकर खाडीपार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच ३५/जी-४१६८) असे एकूण चार ट्रॅक्टर पकडलेहे चारही ट्रॅक्टर सडक-अर्जुनी तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. पुढील दंडात्मक कारवाई तहसीलदार परळीकर करीत आहेत. (वार्ताहर)
अवैध रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले
By admin | Published: February 17, 2016 1:23 AM