शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

रेल्वे स्थानकावर लागणार चार वॉटर वेंडिंग मशीन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 9:17 PM

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन लावून प्रवाशांसाठी शुद्ध व शीतल जल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे स्थानकावर चार वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे१२ स्थानकांत लागल्या ३३ मशिन्स : दपूमच्या सहा स्थानकांत लागणार नऊ मशीन्स

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन लावून प्रवाशांसाठी शुद्ध व शीतल जल उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे स्थानकावर चार वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात येणार असल्याची माहिती आहे.प्रवासादरम्यान प्रवासी रेल्वे स्थानकावरील नळांचे पाणी भरून आपली तहान भागवितात. यात मोठ्यांपासून चिमुकल्यांनाही तेच पाणी दिले जाते. कित्येक ठिकाणचे पाणी पिण्या योग्य असते किंवा नसते. शिवाय गाड्यांत जास्तीचे दर आकारून पाण्याची बाटल विकली जाते. श्रीमंतांना पाण्याची बाटल खरेदी करणे परवडते. मात्र गरिबांना रेल्वे स्थानकावरून पाणी भरणे हाच उपाय असतो. अशात पाण्यामुळे तब्येत बिघडण्याचे प्रकारही घडतात. यावर तोडगा म्हणून रेल्वेने रेल्वे स्थानकांवर शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसाठी हा प्रयोग अंमलात आणला आहे.सध्या दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांवर एकूण ३३ मशीन लावण्यात आल्या आहेत. यात बिलासपूर, रायगड, चाम्पा, कोरबा, अकलतरा, रायपूर, भाटापारा, भिलाई पॉवर हाऊस, दुर्ग, तिल्दा, डोंगरगड व राजनांदगाव आदी स्थानकांचा समावेश आहे. यात मशिन्सचे इन्स्टॉलेशन व काऊंटरचे संचालन केले जात आहे. या व्यवस्थे अंतर्गत काऊंटर बनवून मशीनद्वारे पाणी प्रवाशांच्या मागणीनुसार बाटल्यांमध्ये भरून दिले जात आहे. त्यासाठी कमीत कमी पैसे प्रवाशांना द्यावे लागत आहे.अशाप्रकारे प्रवाशांना शुद्ध व शीतल पाणी मशीनद्वारे मिळत आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे सद्यस्थितीत नागपूर रेल्वे मंडळाच्या डोंगरगड स्थानकात एक व राजनांदगाव स्थानकात एक वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात आली आहे. या मशीन्स लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्याद्वारे प्रवाशांना शुद्ध व शीतल जल कमी दरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नागपूर मंडळातील विविध रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यानुसार गोंदिया स्थानकात चार, भंडारा रोड येथे एक, इतवारी एक, छिंदवाडा एक, चांदाफोर्ट एक व बालाघाट स्थानकावर एक अशा एकूण सहा स्थानकांवर नऊ वॉटर वेंडिंग मशीन लावण्यात येणार आहेत.पवित्र कार्यात रेल्वेही भागीदारगोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गाडीच्या डब्याजवळ येवून पाणी भरून देण्याची मागील कित्येक वर्षांपासूनची परंपरा आहे. ‘मटका कोला’ म्हणून रेल्वे स्थानकावरील ही सुविधा चांगलीच प्रसिद्ध आहे. कोणताही गाडी असो प्रवाशांना कार्यकर्ते त्यांच्या डब्या जवळ जावून पाणी भरून देतात. पाण्याचे पुण्य असून या पवित्र कार्यात तरूणांपासून वृद्धही आपली सेवा देत पुण्य कमावीत आहेत. त्यात आता रेल्वे ही भागीदार झाली असून पाण्याच्या सोयीसाठी मशीन लावून प्रवाशांना अधीक सुविधाजनक करून देत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेWaterपाणी