लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेंशन देण्याच्या नावावर वृध्दांना लुटणाºया व्हाईस वन क्रेडीट को. आॅपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड गोेंदियाचे व्यवस्थापकीय संचालक वचनानंद विजयानंद खंडारे (३८) रा.टी.बी.टोली गोंदिया याला ११ महिन्यानंतर अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने या आरोपीला २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.गोंदियाच्या अवंती चौक रिंग रोड येथे ३१ डिसेंबर २०१४ पासून व्हाईस वन क्रेडीट को. आॅपरेटीव्ह सोसायटी लिमीटेड गोेंदियाच्या नावाने शाखा उघडून वृध्दांना पेंशन देण्याच्या नावावर लुटण्याचा गोरखधंदा सुरू होता. या सोसायटीने रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा परवाना नसताना नागराच्या वॉर्ड क्र. ३ येथील फिर्देलाल नत्थू फुन्ने (६७) यांच्याकडून ३ लाख २० हजार रूपये घेतले. त्यांना या पैश्यापोटी ४ हजार ८०० रूपये दरमहा पेंशन पाच वर्षापर्यंत देण्याचे आमिष दाखविले.त्यासाठी त्यांनी ३ लाख २० हजार रूपये त्या सोसायटीत दिले. परंतु त्यांना पेंशन न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. या संदर्भात फिर्देलाल फुन्ने यांनी रामनगर पोलिसात तक्रार केली होती. यासंदर्भात रामनगर पोलिसांनी २५ फेब्रुवारी २०१७ रोजी आरोपी व्यवस्थापकीय संचालक वचनानंद खंडारे (३८) रा. टीबीटोली, सहाय्यक संचालक कमल उर्फ बाबा लिल्हारे रा. कुडवा, व्यवस्थापक आरती बघेले रा. तुमखेडा व व्हाईस वन क्रेडीट को. आॅपरेटीव्ह सोसायटी लिमीटेड गोेंदियाचे पदाधिकारी व कर्मचाºयांविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ४५ (५), ५८ (ब) भारतीय रिजर्व्ह बँक आॅफ इंडिया कायदा १९३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर आरोपीला राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या बिरसी येथील टोलनाक्यावरून पहाटे २.४५ वाजता अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख करीत आहेत.न्यायालयासमोर असे ठेवले होते मुद्देआरोपीला अटक केली तेव्हा त्याच्या खिशात बँकेच्या जुन्या स्लीप आढळल्या आहेत. हे रॅकेट असल्याचा संशय आहे. अर्थप्राप्तीसाठी स्थापन केलेल्या सोसायटीत कुणाकुणाचा समावेश आहे याची माहिती घेणे आहे, आरोपी व्यवस्थापकीय संचालक असल्याने ग्राहकांकडून किती पैसे वसूल केले याची माहिती, ती रक्कम कुठे वळती केली, कुठे प्रापर्टी खरेदी केली याची माहिती घेणे, या प्रकरणात पिडितांची संख्या जास्त असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.
सोसायटीच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:24 PM
पेंशन देण्याच्या नावावर वृध्दांना लुटणाºया व्हाईस वन क्रेडीट को. आॅपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड गोेंदियाचे व्यवस्थापकीय संचालक वचनानंद विजयानंद खंडारे (३८) रा.टी.बी.टोली गोंदिया याला ११ महिन्यानंतर अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्दे२९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी : पेंशनच्या नावावर वृद्धांची लूट