शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

यंदा ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2017 12:44 AM

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार

१३५ शाळांत २५ टक्के प्रवेश : अर्ज करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२(१)(सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. शासन निर्णयानुसार २५ टक्के मोफत प्रवेश योजना आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यांतर्गत यंदा जिल्ह्यातील १३५ शाळांत ११०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचे बोलले जात असून शिक्षणावरील आजचा खर्च बघितल्यास ही बाब खरोखरच वाटते. या महागड्या शिक्षणामुळे अंगी गुण असलेला होनहार विद्यार्थी वंचीत राहू नये यासाठी शासनाने शिक्षणाचा अधिकार कायदा लागू केला. यांतर्गत गरजू व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांत २५ टक्के प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी गरजू घटकाला याचा चांगलाच फायदा मिळत असून अशांची मुले शिक्षण घेत आहेत. तर येणाऱ्या शिक्षण सत्रासाठी शाळा नोंदणी १६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी होणार आहे. पालकांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज ५ ते २१ तारखेपर्यंत भरावयाचे आहेत. यात पहिली लॉटरी २७ आणि २८ तारखेला काढली जाईल. तर १ ते ९ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यावयाचे आहेत. प्रवेश घेण्याच्या विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १० ते ११ मार्चपर्यंत दर्शवावयाच्या आहेत. दुसरी लॉटरी १४ व १५ मार्च रोजी असून १६ ते २१ मार्च पर्यंत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. २२ व २३ मार्चपर्यंत विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या असून तीसरी लॉटरी २४ व २५ मार्च रोजी राहील. विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे २७ मार्च ते १ एप्रिल व विहित मुदतीनंतर शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा ३ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत दर्शवायच्या आहेत. चवथी लॉटरी ७ व ८ एप्रिल रोजी असून १० ते १५ एप्रिल दरम्यान विहित मुदतीत पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा १७ व १८ एप्रिल रोजी दर्शवायच्या असून पाचवी लॉटरी १८ एप्रिल आणि २० एप्रिल रोजी राहील. २१ ते २७ एप्रिल दरम्यान पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. तर २८ ते २९ एप्रिल दरम्यान शाळांनी रिक्त पदाची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवायच्या आहेत. सदर प्रवेश प्रकियेदरम्यान संबधित तालुक्याचे गटसाधन केंद्रस्थळी मदत केंद्र निर्माण केले आहे. सदर काळात सर्व शाळांनी शाळा नोंदणी व पालकांनी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सी.एल. पुलकुंडवार व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)