आमगाव : राज्यातील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची वाट धरावी आणि त्यांच्यात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बदल घडविण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यात आता आदिवासींच्या मुलांना उच्च शिक्षणाची दिशा मिळावी यासाठी शासनाने मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरु केले आहे. यात खासगी संस्थाही प्रतिसाद देत आहेत.शासनाने राज्यातील आदिवासी नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. आदिवासीबहुल परिसरातच त्यांना प्राथमिक ते उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासकीय व खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य निरंतर शासनाकडून सुरु आहे. कालांतराने या विद्यार्थ्यांना शहरी भागातून मिळणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी आपल्याकडे आकृष्ट केले. परंतु शैक्षणिक शुल्क व विविध अडचणींमुळे या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण घेणे कठीण होते. शासनाने आदिवासी नागरिकांच्या मुलांनाही केंद्रीय बोर्डाचे सीबीएसई, आयसीएसई या इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देण्यासाठी योजना सुरू केली.सन २०१०-११ मध्ये शासनाने २४ प्रकल्पाअंतर्गत राज्यात या शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांसाठी सुरु केली. प्रारंभी ठाणे नाशिक, रामटेक, अमरावती या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करुन दिले. विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रमात शासकीय आश्रम शाळा व खाजगी अनुदानीत शाळा नागपूर विभागात १५७ आहेत. यात प्राथमिक ते माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात ८० हजार ८६४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची सोय शाळेतच उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासन योजनेला अधिक बळकट करित आहे. परंतु आदिवासी मागास परिसरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी संस्थानांकडे वळावे लागत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या माध्यमांच्या बदलामुळे देवरी प्रकल्पातील १४० विद्यार्थी प्राथमिक शिक्षणातूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळले आहेत. त्यामुळे आदिवासीं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी खाजगी संस्थानांचा प्रतिसाद मिळत आहे. (शहर प्रतिनिधी) युवकाची आत्महत्याआमगाव : रिसामा येथील ग्रा.पं.च्या विहिरीत उडी घेवून संतोष महाविरसिंग बैस (३२) यानी आत्महत्या केली. त्यांच्याकडे संपूर्ण कुटुंबाचा भार होता. ही घटना मंगळवार (१ जुलै) ला सकाळी ९ वाजता उघडकीस आली. सदर घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
आदिवासी मुलांना मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण
By admin | Published: July 01, 2014 11:32 PM