शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मोफत धान्य वाटपात होत आहे घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 5:00 AM

‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणारे धान्य अंत्योदय योजना व प्राधान्यक्रमा अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच अतिशय गरजू व्यक्तीला देण्यास प्राधान्य आहे.

ठळक मुद्देबायोमॅट्रिक नसल्याचा गैर फायदा । अधिकाऱ्यांचे प्रकाराकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ‘लॉकडाऊन’मुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने नियमित रेशन देण्याव्यतिरिक्त लाभार्थ्यांला दर महिन्याला प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मागील २ दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटपाला सुरूवात झाली असून अनेक स्वस्त धान्य दुकानदार तांदूळ वाटपात गैरप्रकार करीत असल्याची ओरड तालुक्यात अनेक गावात सुरू आहे.‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणारे धान्य अंत्योदय योजना व प्राधान्यक्रमा अंतर्गत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच अतिशय गरजू व्यक्तीला देण्यास प्राधान्य आहे. मोफत तांदूळ वाटप करताना बायोमॅट्रिक प्रणालीचा वापर करण्याची गरज नाही. शिधापत्रिकेवर जेवढ्या व्यक्तीची नोंद आहे तेवढ्यांना प्रत्येकी ५ किलो प्रमाणे तांदूळ द्यायचे आहे. परंतु तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार घोळ करीत असल्याचा प्रकार सामोर आला आहे.तालुक्यातील एकूण ८७ स्वस्त धान्य दुकानांमधील अनेक दुकानदारांनी शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून मनमानी करीत असल्याची माहिती आहे. एका गावात एक शिधापत्रिकाधारक मोफत स्वस्त धान्य मागायला गेले असता कार्डवर ५ लोकांची नोंद असून त्याला २५ किलो तांदूळ देण्याऐवजी फक्त १५ किलो तांदूळ दिले.एका दुसऱ्या दुकानदाराने २० किलो ऐवजी १५ किलो दिल्याची तक्रार आहे. एका दुकानदाराने धान्यच आले नाही म्हणून कार्डधारकाला परत घरी पाठविले. तर एका दुकानदाराने या महिन्यात मिळणार नाही असे सांगितल्याची तक्रार समोर आली आहे.१ एप्रिलपासून मोफत तांदूळ देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश असून सुद्धा काही स्वस्त धान्य दुकानदार ग्रामीण भागातील जनतेला मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रसार माध्यमातून आता शासनाचे प्रत्येक निर्णय लोकांना त्वरीत व स्पष्टपणे माहिती होतात. तरी काही लोक आपली चालाखी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासना आदेशाप्रमाणे लोकांना धान्य वाटप केले जात आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी तहसीलदारांनी आपली यंत्रणा कामाला लावली पाहिजे.तसेच संशयीत ठिकाणी स्वत: जावून पाहणी केली पाहिजे. परंतु तहसीलदार या बाबतीत स्वयंस्फूर्त दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या समस्या कोण सोडविणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.धान्य वाटपात विलंब का?प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून करणे गरजेचे होते. काही तांत्रिक अडचणींचा अपवाद वगळता १-२ दिवस उशीर समजता येईल. परंतु मोफत धान्य वाटपात पूर्ण एक आठवडा उशीरा झाला असून काही दुकानदारांनी आतापर्यंत वाटप सुरू केले नाही. दरम्यान ‘लोकमत’ प्रतिनिधीने याबाबत सुरूवातीला ३ एप्रिल रोजी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता शासनाचे आदेश मिळाले नाही व मोफत देण्याचे तांदूळ सुद्धा आले नाही असे सांगितले. त्यानंतर लगेच तहसीलदारांशी विचारपूस केल्यावर पदाला साजेसे उत्तर न देता गोदाम खाली नसल्याने धान्य आणले नाही असे सांगीतले. यावरून अधिकारी किती जवाबदारीने शासन आदेशाचे पालन करीत आहेत हे दिसून आले.लाभार्थी कार्डधारकांना शासनाच्या आदेशान्वये मोफत तांदूळ न देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारविरूद्ध कार्यवाही करण्यात येईल. यात आपली जवाबदारी इमानदारीने पार पाडत नसल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही गय केली जाणार नाही.-सहषराम कोरोटेआमदार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र.

टॅग्स :government schemeसरकारी योजना