लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीमुळे बाजारात नागरिकांची गर्दी वाढत असताना दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवून अतिक्रमण केले जात आहे. यामुळे नागरिकांना होत असलेली अडचण व त्रास लक्षात घेत पालिकेने बाजारातील रस्ते मोकळे करण्यासाठी शुक्रवारी (दि.१३) मोहीम राबविली. यांतर्गत नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी थेट बाजारात शिरल. त्यांनी दुकानदारांकडून करण्यात आलेले अतिक्रम हटविले व नागरिकांसाठी रस्ते मोकळे करवून घेतले.शहरातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यातही बाजारातील रस्त्यांची बात काही औरच आहे. असे असतानाही बाजारातील दुकानदार दुकानातील सामान रस्त्यांवर आणून ठेवतात. अशात अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद होतात. परिणामी नागरिकांना वाहतूक करताना अडचण होते. आता दिवाळी असल्यामुळे शहरासह परिसरातील नागरिक खरेदीसाठी बाजारात येत असल्यामुळे बाजारात एकच गर्दी होत आहे. अशात दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेल्या सामानामुळे वाहतूकीची कोंडी वाढली असून नागरिकांना त्रास होत आहे.नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत नगर परिषदेने बाजारातील रस्ते मोकळे करण्यासाठी शुक्रवारी (दि.१३) मोहीम राबविली. यांतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रशासनिक अधिकारी सी.ए.राणे, बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा यांच्यासह अन्य कर्मचाºयांनी स्वत: बाजारात जाऊन दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास लावून रस्ते मोकळे करवून घेतले.विशेष म्हणजे, दिवाळीची गर्दी बघता नगर परिषदेकडून रस्त्यांवरील अतिक्रमणाच्या विषयाकडे लक्ष दिले जात आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक व्यवस्थेसाठी बॅरीगेड्स लावण्यात आले असून चारचाकींना प्रवेश नाकारण्यात आला आहे.त्याचप्रकारे नगर परिषद सुद्धा लक्ष देत असून अशाच प्रकारे पुन्हा मंगळवारी मोहीम राबविला जाणार असल्याची माहिती आहे.
बाजारातील रस्ते मोकळे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:13 PM
दिवाळीमुळे बाजारात नागरिकांची गर्दी वाढत असताना दुकानदारांकडून रस्त्यावर सामान ठेवून अतिक्रमण केले जात आहे.
ठळक मुद्देपालिकेने राबविली मोहीम : नागरिकांच्या सुविधेसाठी कर्मचारी रस्त्यावर