कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी ८८४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ७९० नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना बाधित आढळला नाही. तर बाधित आणि मात करणाऱ्यांची संख्या शुन्यच होती त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ ही कायम होती. कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली असून चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण देखील कमीच आहे. त्यामुळे आठवडाभरात जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोेरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २०९५०८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली यापैकी १८४१६२ नमुने निगेटिव्ह आले. काेरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २२०५७२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १९९४८९ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११७० कोरोना बाधित आढळले असून ४०४५३ बाधितांनी मात केली आहे. सद्यस्थितीत १६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २५४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
सलग चौथ्यांदा शुन्य बाधितांची नोंद
कोरोना बाधितांची संख्या सातत्याने कमी होत असून या महिन्यात सतत चौथ्यांदा शुन्य कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
............
५ लाख १५३५२ जणांनी घेतली लस
कोरोना विरुध्दच्या लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात १४० लसीकरण केंद्रावरुन लसीकरण सुरु असून आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३५२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
......