लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम बरबसपुरा येथील अग्नितांडवात आपले घर गमावून बसलेल्या ११ परिवारांच्या मदतीसाठी शासनाने १०.४६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत तहसीलदारांना अधिकृत आदेश काढले असून लवकरच ११ परिवारांच्या बँक खात्यात प्रत्येकी ९५ हजार रूपयांनुसार मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे.६ मे रोजी ग्राम बरबसपुरा येथे रात्री आगीची घटना घडली होती. यात थानसिंग बलवंत लिल्हारे, दिनदयाल थानसिंग लिल्हारे, भोजराज लालजी नागपुरे, बाबूलाल लालजी नागपुरे, शोभेलाल लालजी नागपुरे, मुलचंद लालजी नागपुरे, तोमेंद्र लालजी नागपुरे, तुळशीराम धुरणलाल नागपुरे, चोवाबाई घुरणलाल नागपुरे, सदाराम धुरणलाल नागपुरे व परमेशवरी भागवत माहुले यांची घरे जळाली होती. आगीने या परिवारांच्या डोक्यावरील छत हिरावून घेतल्याने हे परिवार उघड्यावर आले. यावर आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या ११ परिवारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला. परिणामी या परिवारांना आर्थिक मदतीसाठी १०.४६ लाख रूपयांचा निधी शासनाने नैसर्गिक आपत्ती सानुगृह मदत योजनेंतर्गत मंजूर केला आहे. याबाबत २३ तारखेला तहसीलदारांनी अधिकृत आदेश काढले आहेत. या निधीतून प्रत्येक परिवाराला ९५ हजार रूपये प्रमाणे आर्थिक मदत दिली जाणार आहे.आमदारांकडून भांडे व धान्याची त्वरीत मदतया ११ परिवारांतील ३ परिवारांचे सर्वच काही आगीने हिरावून घेतले. या तीन परिवारातील सदस्यांच्या अंगावर जे कपडे होते तेवढेच त्यांच्या जवळ शिल्लक राहिले. ही बाब लक्षात घेत आमदार अग्रवाल यांनी या ३ परिवारांना पलंग, गाद्या, टेबल पंख, धान्य व भांडे देवून मदत केली. आता ही आर्थिक मदत मिळणार असल्याने या सर्वच परिवारांना पावसाळ््यापुर्वी घराचे छत दुरूस्त करता येणार आहे.
अग्नितांडवातील नुकसानग्रस्तांसाठी १०.४६ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 9:42 PM
तालुक्यातील ग्राम बरबसपुरा येथील अग्नितांडवात आपले घर गमावून बसलेल्या ११ परिवारांच्या मदतीसाठी शासनाने १०.४६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत तहसीलदारांना अधिकृत आदेश काढले असून लवकरच ११ परिवारांच्या बँक खात्यात प्रत्येकी ९५ हजार रूपयांनुसार मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे.
ठळक मुद्देबरबसपुरातील ११ परिवारांना मतदान : प्रत्येकी ९५ हजारांची आर्थिक मदत