शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विकासकामांसाठी केंद्रातून निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 9:40 PM

शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी तसेच शहरात विकासकामे व्हावीत यासाठी केंद्रातून पर्याप्त निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केली.

ठळक मुद्देनगराध्यक्ष इंगळे यांची मागणी : केंद्रीय मंत्री गडकरी यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील वाहतुकीची कोंडी सुटावी तसेच शहरात विकासकामे व्हावीत यासाठी केंद्रातून पर्याप्त निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केली. यासाठी त्यांनी केंदीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले.नगराध्यक्ष इंगळे यांनी, नामदार गडकरी यांना या भेटीत शहरातील लोकसंख्या सुमारे तीन लाखांच्या घरात असून शहरातील रस्त्यांच्या आजच्या स्थितीमुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. यातून अपघातांचे प्रमाण वाढले असून शहरवासी त्रस्त आहेत.याकरिता शहरातील रस्त्यांची कामे करणे अत्यावश्यक असून सोबतच अन्य विकासकामांची गरज आहे. यासाठी केंद्रातून पर्याप्त निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी त्यांनी केली.तसेच शहरातील विविध समस्या मांडत त्यांनी नामदार गडकरी यांना आवश्यक त्या कामांचे प्राथमिक अंदाजपत्रक संबंधीत विभागांकडून मागवून आर्थिक नियोजन करून सीआरएफ अंतर्गत या कामांना मंजूरी देण्याचीही मागणी केली.यावर नामदार गडकरी यांनी, सर्व कामांची आवश्यकता लक्षात घेत याच आर्थिक वर्षात यांना पूर्ण करण्यासाठी मंजूरी दिली.निवेदनात या कामांचा समावेशनगराध्यक्ष इंगळे यांनी दिलेल्या निवेदनात, ग्राम कटंगी ते फुलचूर नाका पर्यंत उड्डाणपूल व रस्त्यांचे सिमेंटीकरण, मरारटोली रेल्वे चौकी ते बायपास पर्यंत उड्डाणपूल, हड्डीटोली रेल्वे चौकी ते मरार समाजभवन पर्यंत उड्डाणपूल, भिमनगर मैदान जवळ रेल्वे चौकीवर अंडरग्राऊंड किंवा उड्डाणपूल, दुर्गा चौक ते मालधक्का-राजलक्ष्मी चौक पर्यंत लहान पूल, रानीसती लॉज येथून पायदळ पूल, कस्तूर हॉटेल जवळून रेल्वे क्रॉसिंगहून पायदळ रस्ता, कालेखा चौक ते बंगाली शाळा- गुजराती शाळा-पाल चौक पर्यंत रस्ता रूंदीकरण व सौंदर्यीकरण, कुडवा नाका ते बालाघाट रोड पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम व सौंदर्यीकरणाचा समावेश आहे.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी