लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील धोटे सुतीका गृहाच्या बांधकामाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता. शासनाच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतंर्गत यासाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्यात आला आहे. वर्षभरात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या सुतीका गृहाची शहरातील नागरिकांना मोठी मदत होणार आहे. सुतीका गृहाचे बांधकाम अंत्यत दर्जेदार करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिली.शहरातील रेलटोली परिसरातील नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या धोटे सुतीका गृह (मातृत्व दवाखाना) इमारत बांधकामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, जमीन दानदाते लव धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, माजी आ.रमेश कुथे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, शहरध्यक्ष सुनील केलनका, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, न.प.गटनेते घनश्याम पानतवने, सभापती धर्मेश अग्रवाल, मौसमी परिहार,नीतू बिरीया, सचिन शेंडे, वर्षा खरोले, रत्नमाला शाहू उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री परिणय फुके यांच्या हस्ते धोटे सुतीका गृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.फुके म्हणाले गोंदिया नगर परिषदेत भाजपची सत्ता आल्यापासून शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे करण्यात आली. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी ४० कोटी रुपयांचा विकास कामांना मंजुरी दिली असून या कामांचे भूमिपूजन सुध्दा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. धोटे सुतीका गृहाच्या इमारतीत गोरगरीब रुग्ण आणि गभर्वती महिलांवर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही इमारत अंत्यत आधुनिक दर्जेदार कशी तयार करता येईल याकडे निश्चित लक्ष दिले जाईल असे सांगितले. या इमारतीसह शहरातील अनेक विकासात्मक कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील यासाठी निधी कमी पडू देणार अशी ग्वाही फुके यांनी दिली.निधी आम्ही आणतो श्रेय मात्र दुसरेच घेतातनगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी शहरातील विकास कामांसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन आणला. तसेच मी देखील अनेक कामांना मंजुरी मिळवून आणली. मात्र शासनाकडे पाठपुरावा करुन निधी आम्ही मंजुर करुन आणतो पण त्याचे श्रेय कुणी दुसरेच घेत असल्याची टीका नाव न घेता केली.भूमिपूजनासाठी आमची वाट न पाहता पक्षातील जेष्ठ नेते आणि नगरसेवकांच्या हाताने भूमिपूजन करुन कामे सुरू करण्यास नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना सांगितले.इंदिरा क्रीडा संकुलासाठी निधी देणारनगर परिषदेतंर्गत येणाºया शहरातील इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या अत्याधुनिकरणासाठी निधीची मागणी नगर परिषदेने केली आहे.यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर करण्याची ग्वाही पालकमंत्री फुके यांनी दिली.
विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 8:43 PM
येथील धोटे सुतीका गृहाच्या बांधकामाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलबिंत होता. शासनाच्या वैशिष्टय पूर्ण योजनेतंर्गत यासाठी ४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करण्यात आला आहे. वर्षभरात हे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून या सुतीका गृहाची शहरातील नागरिकांना मोठी मदत होणार आहे.
ठळक मुद्देपरिणय फुके : धोटे सुतिका गृह बांधकामाचे भूमिपूजन