शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

चीनी वस्तूंची प्रेतयात्रा व दहन

By admin | Published: July 10, 2017 12:42 AM

भारत-चीन सीमेवर चीनद्वारा घुसखोरीच्या कुरघोड्या नित्याचीच बाब झाली आहे. भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंची धूम आहे.

देशाभिमानाचा परिचय : तिबेटीयन बांधवही सरसावलेलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : भारत-चीन सीमेवर चीनद्वारा घुसखोरीच्या कुरघोड्या नित्याचीच बाब झाली आहे. भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंची धूम आहे. चीन भारतीय बाजारपेठेमुळे आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊन भारतावरच पलटवार करतो आहे.त्या निषेधार्थ रविवारी (दि.९) अर्जुनीवासीयांनी चीनी वस्तूंची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली व या वस्तूंचे दहन स्मशानभूमीत करुन देशाभिमान जागृततेचा परिचय दिला. या अनोख्या कार्यक्रमात गावकरी, शालेय विद्यार्थी व व्यापारीसुद्धा सामील झाले होते. चीनी वस्तूंची खरेदी व वापर करणार नाही अशी शपथ घेऊन इतरांनीही वापर व खरेदी करु नये यासाठी परावृत्त करण्याचा संकल्प स्मशानभुमीत घेतला. या प्रेतयात्रा, दहन व वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन नगर विकास मंचच्यावतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला एस.एस.जे. महाविद्यालय, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना पथक, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व गावकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ही प्रेतयात्रा येथील दुर्गा चौकातून रविवारी (दि.९) सकाळी १० वाजता निघाली व मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत स्मशानभूमीत पोहोचली. व्यापाऱ्यांनी सुद्धा समर्थन दर्शवित चीनी वस्तू दहनासाठी संकलन वाहनात घातल्या. स्मशानभूमीत ही प्रेतयात्रा पोहोचल्यानंतर तेथे उपस्थितांनी चिनी वस्तूंच्या वापर व खरेदी करणार नाही अशी सामूहिक शपथ ग्रहण केली. त्यानंतर तिरडीवर लोकांनी स्वयंस्फूर्तीने ठेवलेल्या चीनी वस्तूंचे दहन केले.प्रेतयात्रा मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करीत असताना गावकऱ्यांनी आपल्या घरातील चीनी वस्तू आणून तिरडीवर घालाव्यात अशा उद्घोषणाद्वारे ओमप्रकाशसिंह पवार, प्रा. शरद मेश्राम, डॉ. गजानन डोंगरवार, लोपसंग टेम्पा, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, आनंदकुमार जांभुळकर, कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे, नगरसेवक येमू ब्राम्हणकर, सुरेंद्रकुमार ठवरे, प्रा. इंद्रनिल काशीवार, प्रा.जे.डी. पठाण यांनी आवाहन करुन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. पश्चात स्मशानभुमीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमासाठी राजकिशोर शाह, गिरीश बागडे, मोरगावचे उपसरपंच राजू पालीवाल, नवीन नशिने, एस.जे. महाविद्यालयाचे प्रा.डॉ. राजेश चांडक, प्रा. शरद मेश्राम, सदानंद मेंढे, शाम चांडक, यशवंत कुंभरे, लोकेश उखरे, अश्विनसिंह गौतम, प्राचार्य सुनील पाऊलझगडे, रामू जिवानी, महेश पालीवाल, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, नगरसेविका प्रज्ञा गणवीर, वंदना शहारे, नगरसेवक माणिक मसराम, हेमंत भांडारकर, राजू श्विणकर, बालू बडवाईक, विकास नगरकर, राधश्याम भेंडारकर, विकास कोराम, सुमित पशिने, हिमालय पाचोळे, योगराज मिश्रा, लुमेष सूर्यवंशी, क्रिष्णा कोहरे, एल.एस. ब्राम्हणकर, विजय इरले, प्रा. ठाकरे, सुरज चुटे, शंभूदेव मुरकुटे, प्रकाश बागडे, नाना शहारे, जितेंद्र ठवकर, दिलीप लोधी, प्रशांत गाडे, पंचम भलावी व अर्जुनी-मोरगाववासी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.तिबेटीयनांचाही सहभाग चीनने तिबेटवर आक्रमण केले. तिबेटमध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांवर चीनकडून अत्याचार केला जात आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव नार्गोलिंग तिबेटीयन वसाहतीतील शरणार्थी तिबेटीयनांची कित्येक वर्षापासून स्वतंत्र तिबेटची मागणी आहे. यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. रविवारी अशी शवयात्रा निघत असल्याची माहिती मिळताच तिबेटीयनांनी चीनी वस्तू आणून शवयात्रेत उपस्थिती दर्शविली. तिबेटीयनांचे गुरु लोपसंग टेम्पा यांनी असे कार्यक्रम वारंवार घ्यावे तिबेटीयन सदैव सहकार्य करतील असे मार्गदर्शन केले. यावेळी लोपसंग सिरींग, केलसंग छोटा, तेनजीन पासंग, तेनजीन तांजे, रिनजीन छनपेल, लहामो सिरींग, गुरुने देवेंग उपस्थित होते.