कोरोना लॉकडाऊनच्या काळात शाळा व महाविद्यालये बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले होते. शासनाच्या आदेशानुसार शाळ व महाविद्यालये २३ नोव्हेंबरला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मास्क लावून शाळेत येणे सुरू केले आहे. उत्साही विद्यार्थी शाळेत येत असतात. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची बरीच उपस्थिती असते. या शाळेतील चार शिक्षक जागृती सहकार पतसंस्था मुंडीकोटा येथे संचालक मंडळात होते. पण या पतसंस्थेत घोटाळा झाल्यामुळे अनेक संचालक मंडळातील संचालक फरार आहेत. यात सुभाष विद्यालय मुंडीकोटा या शाळेतील ४ शिक्षक असून हे शिक्षक मागील दीड महिन्यांपासून फरार आहेत. यावेळी १० वी व १२ वीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असून या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे चित्र या शाळेत दिसत आहे. तरी संबंधित प्राचार्य व प्रसारक मंडळांनी या शाळेत तासिका शिक्षकांची व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
त्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:27 AM