विद्यार्थ्यांचे कौतुक : सांघिक शाळा उपक्रमांतर्गत निरीक्षण\ सौंदड : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा सात्तयपूर्ण व्यवसायीक विकास संस्थेच्या वतीने सांघिक शाळा भेटीचा उपक्रम सुरु करण्यात आला. या अंतर्गत गडचिरोली पथकाने शाळेला भेट देऊन पाहणी केली. सदर उपक्रमाचे प्रणेते प्रशांत डवरे यांनी राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार व आयुक्त निरजकुमार यांच्या समक्ष सादरीकरण करुन उपक्रमाची महत्ती पटवून दिली. वरिष्ठांनी सांघिक शाळा भेटीच्या उपक्रमाला मंजूर दिली. डायडद्वारे पर्यवेक्षकीय अधिकारी तसेच प्राचार्यांनी उपक्रमाला भेटी देण्याकरिता जिल्हा पथक येत आहेत. एक पथक जि.प. प्राथमिक शाळा नागरी सौंदड-१ येथे भेट दिली. तालुक्यातील शिक्षण विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पथकाने केंद्र सौंदड मधील जि.प. प्राथमिक शाळा नागरी सौंदड १ येथे सांघिक शाळा भेटीचा उपक्रम स्वत:च्या जिल्ह्यात कसा राबविता येईल हे पाहण्याकरिता भेट दिली. शाळा भेटीमध्ये अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ञ होते. सर्व अधिकारी व विषयतज्ञ कसे प्रात्याक्षीक देतात हे पाहीले. शिक्षकांनी निरीक्षण केले. नंतर २५ मुद्याच्या आधारे विद्यार्थ्यांची तपासणी केली. सांघिक भेटीमध्ये डॉ. नरेश वैद्य, केंद्रप्रमुख बन्सोड, बुद्धे, मेश्राम, घुटके उपस्थित होते. सदर उपक्रमाला मुख्याध्यापक एस.एन. परशुरामकर, आर.आर. निर्वाण, पशीने यांनी मार्गदर्शन केले.(वार्ताहर)
गडचिरोलीच्या पथकाने दिली भेट
By admin | Published: January 19, 2017 1:36 AM