शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

दारू दुकानाच्या स्थानांतरणावरून गाजली ग्रामसभा

By admin | Published: May 14, 2017 12:34 AM

येथे ग्रामपंचायत कार्यालयात आज (दि.१३) तहकूब ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतने अनेक विषयावर चर्चा केली.

लोकमत न्यूज नेटवर्क एकोडी : येथे ग्रामपंचायत कार्यालयात आज (दि.१३) तहकूब ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतने अनेक विषयावर चर्चा केली. परंतु दारू दुकानाच्या स्थानांतरण या एकाच विषयाने ग्रामसभा गाजली. १ मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत लोकसंख्येच्या कमीत कमी १०० लोकांची उपस्थिती आवश्यक होती. ती नसल्याने तहकूब करून १२ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेचे अध्यक्ष रविकुमार पटले यांच्या अनुमतीने ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्याचे निर्देश ग्राम विस्तार अधिकारी यांना दिले. त्यानुसार ग्रामसभेला सुरुवात करीत जमा खर्चाला मंजुरी देणे, नवीन कामाचे नियोजन करणे, मनरेगा अंतर्गत घरकुल व शौचालय बांधकामाची माहिती देणे अशा अनेक विषयावर चर्चा करायची होती. परंतु जमाखर्च वाचून झाल्यावर नंतर येणाऱ्या विषयावर दारु दुकान स्थानांतरणाचा विषय होता. मोठ्या संख्येने उपस्थित महिला पुरुषांनी वेळ न घालवता ज्या विशेष मुद्यावर लोकांची नजर होती तोच विषय लोकांकडून प्रथम घेण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी ओ.एन. तुरकर यांनी चर्चेला सुरुवात करीत ग्रामपंचायत कडे दोन दारु दुकानाचे (ज्यामध्ये एक बियरबार व एक चिल्लर व थोक देशी दारू) दुकान मालकाकडून दारु दुकान स्थानांतरण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतकडे आल्याचे सांगितले. न्यायालयच्या आदेशाने शासनाला राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग यांच्यापासून ५०० मिटर अंतरावर असलेल्या दारू दुकानाला मुख्य रस्त्यापासून ५०० मिटर दूर हटविण्याचे ३१ मार्च २०१७ नंतर बंद करण्याचे आदेश दिले होते. सचिवाने दोन दारु दुकानासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याचे सांगितले. परंतु या विषयावर चर्चा करीत असताना असे लक्षात आले की बियरबार मालकाकडून ग्रामपंचायतकडून कोणतीच परवानगी न घेता लोकवस्तीत असलेल्या घरमालकाशी बोलणीकरुन त्या घराची बियरबारला लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधां नियोजित घर तयार करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतने सांगितले. त्यावरुन दारु दुकान समर्थक आणि विरोधक यांच्या एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जरी दोन्ही दुकान हे शासन मान्यतेचे असले तरी त्यांना दुकानाच्या स्थानांतरण प्रक्रियेत लोकवस्तीत दुकान लावण्याचे काहींचे म्हणणे होते. तर समर्थकांकडून असे उदाहरण देण्यात आले की जे दुकान गावात बेकायदेशीर व अवैध रुपाने सुरू आहेत त्यांचे काय? जर गावात शासनमान्य परवाना धारक दुकानाला जर परवानगी ग्रामपंचायत देत नसेल तर गावात सुरू असलेले अवैध दारू दुकान बंद झाले पाहिजे असे दारू दुकान समर्थकांचे म्हणणे होते. हा मुद्दा खूपवेळेपर्यंत रेंगाळत राहिला. यावर मतदान करुन संपूर्ण दारूबंदी गाव करण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली. परंतु उपस्थित लोकांनी संपूर्ण गाव दारुबंदी करण्याकडे कानाडोळा केला. परत बियरबार करीता नियोजित घराच्या जागेवरच चर्चा सुरू करण्यात आली. परंतु त्यातही मोठ्या संख्येत दारू दुकान समर्थक महिला व पुरुष असल्याचे दिसून आले. मतदान होवून त्या जागेवर दुकान लागण्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण विरोधकांनी कित्येक दिवसापूर्वीच ग्रामपंचायतला अर्ज देवून परवानाधारक दुकान असल्याने लोकवस्ती व लोकहित, सामाजिक प्रश्न याचा विचार करुनच लोकवस्तीत दारू दुकानाला परवानगी न देता लोकवस्तीपासून दूर अंतरावर दारू दुकान लावण्यास हरकरत नाही असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे तुर्त या विषयावर तोडगा निघाल्याचे दिसून येते. याविषय नंतर ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच यांनी उपस्थित महिला-पुरुषांना संपूर्ण दारूबंदी गाव करण्याकरिताही समर्थन देण्याचे आवाहन केले. सरपंचाच्या आवाहनाला किती महिलांचे व पुरुषांचे समर्थन करतील याकडे विशेष लक्ष लागून राहील. परंतु लोकवस्तीचा प्रश्न उपस्थित करुन दारू विक्रेत्यांकडून ग्रामसभेत बोलावण्यात आलेला जनसमुदाय असूनही दारू विक्रेत्याचा डाव फसल्याचे दिसून आले. याप्रसंगी प्रकाश पटले पं.स. सदस्य, माजी उपसरपंच किरणकुमार मेश्राम, अजाबराव रिनायत, सावलदास कनोजे, नामदेव बिसेन ग्रा.पं. सदस्य व सभेचे अध्यक्ष सरपंच रविकुमार पटले यांनी आपापले विचार मांडले. याप्रसंगी गावातील महिला-पुरूष मोठ्या संख्येत उपस्थित होते.