लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : नवेगावबांध येथील पेट्रोल पंपाजवळ सुरु असलेल्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या १५ जनांवर कारवाई करण्यात आली. या जुगारात २ लाख ३५ हजार ७८० रुपये रोख व इतर साहित्य असा ४ लाख २३ हजार २१० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व त्यांच्या चमूने केली आहे.१७ जानेवारी रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस हवालदार पारधी, सोनटक्के, टेंभरे, नखाते व जोगेकर यांनी सदर ठिकाणी धाड घातली. या धाडीत १५ जणांना ५२ तासपत्तीच्या माध्यमातून जुगार खेळत असल्याचे आढळले. याप्रकरणात ३ मोटारसायकल व १५ मोबाईल जप्त करण्यात आले. रवी बलादे (४५) रा.नवेगावबांध, निगेश लांजेवार (३०) रा.नवेगावबांध, दिगंबर कांबळे (३१) रा.मुंगली, गणेश कापगते (४२) रा. मुंगली, नरेश शहारे (५०) रा. मुरमाडी, ता.लाखांदूर, चंद्रशेखर राऊत (२७) रा.डोंगरगाव ता.अर्जुनी मोरगाव, राजकुमार बरईया (३०) रा. बोंडगावदेवी, नरेश तरजुले (३२) रा. नवेगावबांध, साईनाथ पाऊलझगडे (४५) रा.सावरटोला, नागेश ठवरे (४५) रा. बोंडगावदेवी, देवीदास मेश्राम (४०) रा. बोंडगावदेवी, अरीफ शेख (३५) रा. नवेगावबांध, आरीफ रफीक शेख (२८) रा.नवेगावबांध, दिलीप सिपानी (५५) नवेगावबांध, विलास कापगते (३३) रा. नवेगावबांध यांना अटक करण्यात आली. २ लाख ३५ हजार ७८० रुपये रोख, एमएच ३५ यू ३६५७, एमएच ३५ एएन २४३४, एमएच ३५एम ९९३७ या तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या तीन मोटारसायकलची किमत १ लाख १० हजार रुपये तर जप्त करण्यात आलेल्या १५ मोबाईलची किमत ७७ हजार ४०० रुपये असा एकूण ४ लाख २३ हजार २१० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 5:00 AM
नवीन बांधकामाच्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या १५ जनांवर कारवाई करण्यात आली. या जुगारात २ लाख ३५ हजार ७८० रुपये रोख व इतर साहित्य असा ४ लाख २३ हजार २१० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व त्यांच्या चमूने केली आहे.
ठळक मुद्देदेवरी पोलिसांची कारवाई : ४ लाख २३ हजाराचा माल जप्त