तिरोडा : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम लोधीटोला व चिरेखनी येथे धाड घालून पोलिसांनी १४ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४,५३५ रुपयांचा माल जप्त केला आहे. ५ व ६ तारखेला रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रविवारी (दि. ५) रात्री ग्राम लोधीटोला येथील साई मंदिरच्या बाजूला सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यात त्यांना उमेश ओंकार लिल्हारे, वडगू शोभेलाल अटराये, ईश्वर बाबुलाल दुधमोरे, राजेश जोसीलाल तिवडे, शुभम टेकचंद लिल्हारे व पतिराम हिरापुरे (सर्व रा. लोधीटोला) जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ५२ ताशपत्ते आणि रोख १,०२५ रुपये जप्त केले. तर सोमवारी (दि. ६) रात्री ग्राम चिरेखनी येथील हनुमान मंदिरच्या मागे धाड घातली असता तेथे विजय खेमलाल रिनाइत, अमित दुलीचंद पारधी, लखन गोपीचंद पारधी, राजन दुलीचंद पारधी, युगल रमेश पारधी, अनिल शंकर नेवारे, गणेश प्रेमलाल रहांगडाले व छत्रपती राधेश्याम रहांगडाले (सर्व रा. चिरेखनी) जुगार खेळताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १,२२५ रुपये व चार मोबाईल असा एकूण ३,५१० रुपयांचा माल जप्त केला. जुगाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.