गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेजगाव खुर्द जंगल शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर १० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता धाड टाकण्यात आली. यात ४ हजार ३०० रुपये रोख व १३ मोटारसायकल, असा ७ लाख २४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १५ ते २० आरोपी जुगार खेळत असताना गंगाझरी पोलीस ठाण्यातील ठाणेदार टिळेकर व इतर पोलिसांनी धाड टाकून सदर साहित्य जप्त केले.
आरोपी पोलिसांना पाहून वाहन व पैसे सोडून पसार झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनात एमएच ३५ वाय ४५९५, एमएच ३५ एक्यू ००१८, एमएच ३५ आर.३६२४, एमएच ३५ वी ६३८९, एमएच ३५ वी ६३८९, एमएच ३५ ए एन ४८९०, एमएच ३५ एके ५१४८, एमएच ३५ एक्यू ४०५४, एम एच ३५ एपी ४१४९, एम एच ३५ ए एन ३८१८ व इतर अशा १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. गंगाझरी पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम १८८, २६८, २६९, सहकलम २३ साथरोग प्रतिबंध, ५१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियमासह ११ महाराष्ट्र कोविड अधि, सहकलम १२ अ मुंबई जुगारबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.