आॅनलाईन लोकमतएकोडी : गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाने एका पाच वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना सोमवारी (दि.२६) सकाळी ९ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा येथे घडली. धनंजय जयेन्द्र मरकाम (५) रा. धामनेवाडा असे मृत बालकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गायधने एन.पी.गॅस एजन्सीची पिकअप वाहन गॅस सिलिंडर भरून धामनेवाडा येथे वितरित करण्यासाठी जात होती.गावात गाडी पोहोचल्यानंतर गावाच्या नागमोडी वळणावर वाहन चालकाच्या निष्काजीपणामुळे धनंजयच्या दोन्ही पायावरुन गाडी गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एच.पी. गॅस एजन्सीच्या गाड्या गॅसचे सिलिंडर वितरित करण्याकरीता दररोज परिसरातील गावात जातात. अनेकदा परिसरातील नागरिकांककडून गाड्यांचा वेग कमी ठेवण्यास वाहन चालकाला सांगितले होते. तर याबाबत अनेकांनी सिलिंडर भरून आलेली गाडी गावातून वेगाने चालवित असल्याच्या तक्रारी सुद्धा एजन्सी मालक यांच्याकडे गावकºयांनी केल्याची माहिती आहे.या घटनेनंतर गावकऱ्यांनी वाहन चालकाविरुध्द रोष व्यक्त केला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकप्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडीला भेट देत मृतकाच्या आईवडील व नातेवाईकांचे सात्वन केले. गावकऱ्यांनी यावेळी मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची केली. तसेच वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली.गंगाझरी पोलिसांनी मौका चौकशी करुन वाहन चालक जयप्रकाश मोतीलाल गायधने (२३) रा. गंगाझरी यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०४ अ, २७९ व १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार शितल जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या वाहनाने बालकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:23 AM