गोंदिया : कोरोनाच्या संकटात सापडणाऱ्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडर वर्षभरात तब्बल २४० रुपयाने महागले. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरधारकांना केवळ दहा रुपये सबसिडी मिळत आहे. एप्रिल २०२० मध्ये गॅस सिलिंडर ७६७ रुपयांना होते. यात ग्राहकांना १७२ रुपयांची सबसीडी मिळत आहे. त्यानंतर मे ते जुलै २०२१ पर्यंत सबसीडी केवळ दहा रुपये सबसिडी मिळत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या परिस्थितीमुळे सर्वच घटकातील लोकांच्या जीवनमानावर परिणाम झाला आहे. यातच गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत एक हजारापर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
......................
महिना-------- सिलिंडरचे दर---- सबसीडी
जुलै २०२०-----६२०-----------९.९५
ऑगस्ट २०२०-----६२०-----------९.९५
सप्टेंबर २०२०-----६२०-----------९.९५
ऑक्टोबर २०२०-----६२०-----------९.९५
नोव्हेंबर २०२०-----६२०-----------९.९५
डिसेंबर २०२०-----६३०-----------९.९५
जानेवारी २०२१-----७००-----------९.९५
फेब्रुवारी -२०२१-----७६२-----------९.९५
मार्च- २०२१-----८२०-----------९.९५
एप्रिल-२०२१-----८३५-----------९.९५
मे-२०२१---------८४५-----------९.९५
जून-२०२१-----८४५-----------९.९५
जुलै २०२१-----८६१-----------९.९५
..........................
शहरात चूलही पेटविता येत नाही
गॅस सिलिंडरचे दर मागील दीड वर्षापासून भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली आहे. गोडेतेलाचे भाव १५० पेक्षा अधिक झाले आहे. गॅस सिलिंडर सुद्धा हजाराच्या घरात आहे. सरकार सर्वसामान्यांचाच छळ करीत आहे.
- सुनीता पाऊलझगडे, गृहिणी, किडंगीपार
...........
दैनंदिन जीवन जगताना गॅस सिलिंडरचा वापर दररोज केला जातो. शहरातील लोकांना सरपण मिळत नाही त्यामुळे गॅसचाच वापर स्वयंपाक करण्यासाठी वापरावा लागतो.
-निर्मला निलकंठ भुते, गृहिणी, शिवणी