लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी सध्या कर्जमाफी आणि पीक विमा काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. आधीच वेळेत कामे होत नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गटसचिवांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने शेतकरी अधिक अडचणीत आले आहे.ग्रामीण भागातील शेतकरी जिल्हा बँक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामधून पीक कर्जाची उचल करतात. हे शेतकºयांच्या दृष्टीने सोयीचे असते. सध्या शेतकरी रोवणीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना सातबारा आॅनलाईन करण्यासाठी सेतू आणि महाआॅनलाईन केंद्रावर जावे लागत आहे. शासनाने पीक विमा काढण्याची मुदत न वाढविल्याने ३१ जुलैपर्यंत पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. यासर्व प्रक्रियेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकºयांची दमच्छाक होत होत आहे. त्यातच आता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गटसचिवांनी शुक्रवार (दि.२८) पासून असहकार आंदोलन सुरू केल्याने शेतकºयांची कोंडी झाली आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या गटसंचिवांची राज्यभरात १० हजारावर संख्या आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून शेतकºयांना कर्ज मिळवून देण्यात या संस्थाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सध्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना गटसचिवांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. सचिव त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. शासकीय सेवेत कायमस्वरुपी समावेश करण्यात यावा, सेवा सहकारी संस्थाचे जिल्हा सहकारी बँकेत विलणीकरण करण्यात यावे, या त्यांच्या मागण्या आहेत. जोपर्यंत या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत असहकार आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका गटसचिवांनी घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. शासन यावर नेमका काय तोडगा काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात ३२९ सहकारी संस्थागोंदिया जिल्ह्यात २९० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व ३९ आदिवासी सेवा सहकारी संस्था कार्यरत आहे. असहकार आंदोलनादरम्यान सरकारला कुठलीच माहिती उपलब्ध न करुन देण्याचा गटासचिवांनी घेतला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असून पीक कर्ज आणि पीक विम्याच्या कामावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लिंक फेलने शेतकरी हैराणकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांना बँकेच्या संकेतस्थळावर सातबारा अपलोड करायचा आहे. पीक विमा काढण्यासाठी देखील महाआॅनलाईन व आपले सरकारच्या केंद्रावर शेतकरी जात आहे. मात्र संकेतस्थळाची लिंक फेल असल्याने शेतकºयांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. हंगामाची कामे सुरू असताना यात संपूर्ण दिवस जात असल्याने शेतकरी हैराण आहेत.आज सर्व बँका सुरू३१ जुलै ही पीक विमा काढण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहू नये, यासाठी रविवारी जिल्ह्यातील सर्व राष्टÑीयकृत आणि जिल्हा बँका सुरू राहणार आहेत. त्यासंबंधीचे निर्देश देखील बँकाना रिजर्व्ह बँकेकडून मिळल्याची माहिती आहे.सरकारकडून सचिवांची वांरवार दिशाभूल केली जात आहे. एकदा काम काढून घेतल्यानंतर मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. असहकार आंदोलनातून सरकारला आमच्या समस्यांची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.ललित गोंडाने, सचिव गटसचिव संघटना गोंदिया
गटसचिवांच्या असहकार आंदोलनाने कर्जमाफीत खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 11:57 PM
शेतकरी सध्या कर्जमाफी आणि पीक विमा काढण्याच्या कामात व्यस्त आहेत.
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : शासनाच्या निर्णयाकडे लक्ष