अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी.एच.जीवानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक एच.ए.नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यु.सी.रंहागडाले, एस.आर.बघेले, प्रा.सुनील लिचडे, प्रा.एस.सी.सुंकरवार, प्रा.राजेश चटर्जी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतिकारी संत सेवालाल महाराजांच्या छायाचित्रासमोर दीपप्रज्ज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. पाहुण्यांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक प्रा.राजेश चटर्जी, बी.आर मेश्राम, प्रदीप राठोड, पी.जी.परशुरामकर, जी.एम.दुधबरई, राजेश निमावत, एन.एस.अग्रवाल, एम.पी.भोयर, डी.एस.साखरे, एस.एन मोरघडे, एन.ए.बुराडे, डी.जेे. डोमळे, विजय वासनिक, कान्हा बघेले, प्रा.रवी लिल्हारे, प्रा.अर्चना उपवंशी, प्रा. प्रियंका भालाधरे, प्रा.संदीप पटले, आर.बी.दमाहे, एम.सी.कोल्हटकर, शक्ती मस्करे उपस्थित होते. संचालन विद्यालयाचे सहायक शिक्षक विनोद माने यांनी केले. आभार सहायक शिक्षक बी.आर.मेश्राम यांनी मानले.
जी.ई.एस.हायस्कूल व कला विज्ञान महाविद्यालय, पांढराबोडी (संत सेवालाल यांची जयंती)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:53 AM