शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कामठाच्या विकासासाठी अधिक निधी मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 8:58 PM

मंदिर व सर्व धर्मस्थळ ऊर्जा व शांतीचे केंद्र आहेत. त्यामुळे सर्व समाजालाच ऊर्जा, आध्यात्मिक शांती व सद्बुद्धी मिळते. या धर्मस्थळांच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार. धर्मनगरी कामठ्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देणार, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : राधाकृष्ण मंदिराच्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मंदिर व सर्व धर्मस्थळ ऊर्जा व शांतीचे केंद्र आहेत. त्यामुळे सर्व समाजालाच ऊर्जा, आध्यात्मिक शांती व सद्बुद्धी मिळते. या धर्मस्थळांच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार. धर्मनगरी कामठ्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देणार, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.कामठा येथील राधाकृष्ण मंदिरात पाच लाख रूपये खर्चाच्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आ. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.आ. अग्रवाल पुढे म्हणाले, कामठा व लहरी आश्रमात आल्यावर मनाला शांती प्राप्त होते. ही धर्मनगरी गोंदिया विधानसभा क्षेत्रात आहे, हे आमचे सौभाग्य आहे. या परिसराच्या विकासासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. आता रावणवाडी-आमगाव मार्ग ते कामठ्याच्या मधातून मुंडीपारसाठी रस्ता बांधकाम केले जात आहे. कामठा ते नवरगावकला रस्ता व पूल, पांगोली नदीवर बंधारा, पाणी पुरवठा योजना, विद्युत उपकेंद्र व क्रीडा तसेच व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी, जिल्हा परिषदेने लहरी आश्रम परिसरात सभामंडप बांधकामाचा निर्णय घेतला आहे. याचे आदेश लवकरच जाहीर होतील, असे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. आरोग्य सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जि.प. सदस्य विजय लोणारे, संतोष घरसेले, कृउबासचे संचालक सावलराम महारवाडे, मनोज दहिकर, सरपंच लिलेश्वर कुंभरे, उपसरपंच प्रकाश शेवतकर, टिकाराम भाजीपाले, गोपालबाबा खरकाटे, माजी सरपंच कल्पना खरकाटे, दिनेश अग्रवाल, संजय अग्रवाल, सुरेंद्र खरकाटे, गुड्डू भाजीपाले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालTempleमंदिर