नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भीक मागून पोट भरणाऱ्या, बालमजुरी करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. प्रत्येक बालक शिक्षणापासून वंचित राहू नये,यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविण्यात आले.जिल्ह्यातील बालके ड्रॉप बॉक्समध्ये असल्यामुळे मुले शाळाबाह्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या बालकांना शोधण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने शाळाबाह्य मूल दाखवा व १ हजार रूपये पुरस्कार घ्या असा उपक्रम सुरू केला आहे.प्रत्येक मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, त्या मुलांना गुणवत्तायुक्त शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीई कायद्यांतर्गत एकही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी तजवीज केली. स्थानिक प्राधिकरणातील प्रत्येक पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागितली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीच शाळाबाह्य मूल दाखवा व १ हजार रूपये बक्षीस मिळवा हा उपक्रम जि.प.शिक्षण विभागाने सुरू केला आहे.या पुरस्काराची रक्कम संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या खिशातून दिली जाणार आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०१८ पर्यंत कधीच शाळेत दाखल न झालेल्या शाळाबाह्य मुलांना दाखविल्यास किंवा ३० दिवस सतत गैरहजर असलेल्या मुलांची माहिती गटशिक्षणाधिकारी मार्फत देण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यात कुडवा, रेल्वे स्थानक, काचेवानी, मुंडीकोटा, सौंदड येथे भीक मागणाºया, मांग-गारुडी, लोहार, फिरणारे नाथजोगी यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.ड्रॉप बॉक्सची संख्या शून्यावर आणणारशाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने १९७ बालरक्षकांची कार्यशाळा घेतली.जिल्ह्यात मागील वर्षी ज्या वर्गात शिक्षण घेत होते ते विद्यार्थी दुसऱ्या वर्षी पुढच्या वर्षात जाणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पुढच्या वर्गात न गेल्यामुळे त्यांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्यात आले. अशा विद्यार्थ्यांचा राज्याबाहेर शाळा प्रवेश झाला का? दुसऱ्या शाळेत गेले का? खासगी शाळांत प्रवेश आहे का? किंवा ते शाळेत जात नाही याची सखोल माहिती काढून ड्रॉप बॉक्सची संख्या शून्यावर आणण्यात येणार आहे.शाळेच्या दर्शनी भागात लागणार फलकशाळाबाह्य मूलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागासमोर ‘शाळाबाह्य मूल दाखवा १ हजार रूपये मिळवा’ असे फलक लावण्याच्या सूूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
शाळाबाह्य मूल दाखवा अन् मिळवा १ हजार; गोंदिया जिल्हा परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:08 AM
भीक मागून पोट भरणाऱ्या, बालमजुरी करणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे.
ठळक मुद्देजि.प.गोंदियाचा उपक्रम : मुख्याध्यापक देणार पुरस्काराची रक्कम