शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

आपत्ती निवारणासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 1:51 AM

पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे,

जिल्हाधिकारी सूर्यवंशी : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सभागोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यातील ८७ गावे पुराने बाधित होतात. तसेच गोंदिया शहरातील नाल्याचे पाणी अतिवृष्टीमुळे लोकांच्या वस्त्यांमध्ये शिरते. त्यामुळे तेथील कुटुंबांना या काळात सुरिक्षत स्थळी हलवावे. नाल्यांची साफसफाई व नाल्यातील गाळ काढण्याचे काम आठ दिवसांच्या आत करावे. नाल्यांमध्ये कचरा, पॉलीथिन साचून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी गटारे, नाले वाहती करावी.८७ पूरबाधित गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देवून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, या गावातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पूरपरिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नदी व नाल्यांच्या सरळीकरणाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करावी. त्यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरास अडथळा निर्माण होणार नाही. लोकवस्तीत पुराचे पाणी शिरणार नाही. अशा लोकवस्तीतील नागरिकांना बाधित अथवा स्थलांतरीत होण्याची वेळ येणार नाही. पूरबाधित गावात बाधित होण्याची कारणे शोधून त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जी कामे करावी लागणार आहेत, त्या कामांचे १० दिवसात अंदाजपत्रक तयार करावेत. त्या कामासाठी आवश्यक निधीची मागणी राज्य आपत्ती प्राधिकरणाकडे लवकर करता येईल. बोटी, होड्या या काळात सुस्थितीत व सुसज्ज ठेवाव्यात. यंत्रणांनी योग्य समन्वयातून आपत्तीवर मात करावी, असे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, आपत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या स्थळांचे तातडीने सर्व्हेक्षण करावे. जी गावे पुराने बाधित होतात त्या गावातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी असावेत. तसेच पुरेसा औषधांचा साठा असणेही महत्वाचे आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर पिण्याच्या पाण्याचे स्रेत असलेल्या ठिकाणी टाकावे. पाणी पुरवठा योजना पुराच्या पाण्यात सापडल्यास पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी जोखीम न घेता या योजना रिमोट कंट्रोलने सुरू करण्यासाठी लक्ष द्यावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष मेंढे यांनी सांगितले की, सालेकसा व आमगाव तालुक्यातील काही गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो. रात्रीच्या वेळी असा प्रसंग उद्भवल्यास एखाद्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेणे शक्य होत नाही. प्रसंगी जीव जाण्याची वेळसुध्दा येऊ शकते. अशाप्रकारची परिस्थिती उदभवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व बाघ इटियाडोह विभागाने वेळीच लक्ष घालून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.सभेला समितीचे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, गोंदिया पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, बाघ व इटियाडोहचे कार्यकारी अभियंता छप्परघरे, जि.प. लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पठाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी के.डी. मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा रक्त संक्र मण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांची उपस्थिती होती. या वेळी जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता समीर बनसोडे यांनी सादरीकरण करून जिल्ह्यातील पूरबाधित गावांची माहिती तसेच रेड व ब्ल्यू झोनमध्ये येत असलेल्या गावांची माहिती दिली. आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (प्रतिनिधी)