शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तिथे 'सेटिंग' का होत नाही?"; बाबा आढावांना सदाभाऊ खोतांचा सवाल
2
लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
3
गर्लफ्रेंडने ५९०० कोटी रुपये कचऱ्यात फेकले; बॉयफ्रेंड पस्तावला, ती म्हणतेय त्यानेच सांगितलेले...
4
Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य:'या' राशींच्या व्यक्तींच्या विवाहास अनुकूल काळ; व्यवसायात भरभराट होईल, आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले
5
Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे काश पटेल FBI चे नवे संचालक
6
EPFO चा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! या मेंबर्ससाठी आधार सीडिंगची अट हटवली
7
मंत्रिपदांचे वाटप अद्याप गुलदस्त्यात; शपथविधी ५ डिसेंबरलाच, भाजपचा नेता ३ ला निवडणार
8
अतिवेग अन् चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानेच अपघात; आरटीओच्या प्राथमिक चौकशीत पुढे
9
LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी सिलिंडर महागला
10
माहिती नष्ट केल्याने फेर मोजणीसाठी दुसरीच यंत्रे; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा
11
अनिल परब यांच्यासह ४८ जण निर्दोष मुक्त; राणे यांच्या सेना त्यागानंतरची धुमश्चक्री
12
"EVM वर विश्वास नाही, तर राजीनामा द्या"; राहुल गांधी-प्रियांका गांधींवर भाजपचा हल्ला
13
हिंदुंवरील अत्याचार त्वरित थांबवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बांगलादेशातील सरकारला आवाहन
14
‘त्या’ विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षकांचीच! बॉन्डवर हमीपत्र दिल्यानंतरच आता सहलीला परवानगी
15
"मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण...", 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली?
16
Today Daily Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या तुमचं राशी भविष्य
17
छोटे पक्ष, अपक्षांना मतदारांनी केले हद्दपार; मुंबईत मोठ्या पक्षांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध
18
‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर
19
चेष्टा सहन न झाल्याने मित्राने केले तरुणावर कात्रीने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू
20
दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा; पुडुचेरीनजीक ‘फेंगल’ धडकल्याने मुसळधार पाऊस; रस्ते, हवाई वाहतूक विस्कळीत

बस स्थानकांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना

By admin | Published: January 03, 2015 1:28 AM

सुरक्षित प्रवासाच्या हमीचे ब्रिद घेऊन धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पाच बसस्थानकच नसल्याची माहिती पुढे आली आहे.

बस स्थानकांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना देवानंद शहारे गोंदियासुरक्षित प्रवासाच्या हमीचे ब्रिद घेऊन धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पाच बसस्थानकच नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र यातील दोन तालुक्यांत केवळ बसस्थानकांच्या इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास झाले असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय २०११ पासून तीन तालुक्याच्या ठिकाणी प्रस्तावित असलेले एसटीच्या आगारांचे प्रस्तावसुद्धा धूळखात असल्याची माहिती आहे. या प्रकारांमुळे प्रवाशांना सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध बसेसचे संचालन करणे एसटी महामंडळाला अवघड जात आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. यातील गोंदिया, तिरोडा व देवरी या केवळ तीनच तालुक्यांच्या ठिकाणी एसटीचे मुख्य बसस्थानके आहेत. गोरेगाव व अर्जुनी/मोरगाव या दोन तालुकास्थळी नवीन बसस्थानकांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र तेथील बसस्थानके खूप कालावधी लोटूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या दोन्ही बसस्थानकांतून बसेसचे संचालन थंडबस्त्यात आहे. तर आमगाव, सालेकसा व सडक/अर्जुनी येथे अद्यापही एसटीचे मुख्य बसस्थानक नाही. सालेकसा येथे मुख्य बसस्थानकासाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरची पुढील कार्यवाही गुलदस्त्यात आहे. सालेकसा हे तालुक्याचे ठिकाण असूनही तेथे केवळ प्रवासी निवारा आहे. आमगाव येथे बसस्थानक तर आहे, मात्र ते मुख्य बसस्थानक नसून केवळ प्रवासी निवाऱ्यासारखे आहे. सडक/अर्जुनी हेसुद्धा तालुक्याचे स्थळ असून तेथे एसटीचे मुख्य बसस्थानक नाही. तेथेसुद्धा केवळ एक प्रवासी निवारा आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोहमारा हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग-६ वर वसलेले आहे. मात्र तेथे मागील पाच वर्षांपासून प्रवासी निवारासुद्धा नाही. पूर्वी कोहमारा येथे प्रवासी निवारा होता. मात्र सन २०१० मध्ये एका ट्रकच्या धडकेत सदर प्रवाशी निवारा कोसळला. तेव्हापासून अद्यापही तेथे बसस्थानक तर दूर साधा प्रवासी निवारासुद्धा तयार करण्यात आला नाही.जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांपैकी केवळ गोंदिया व तिरोडा या दोन ठिकाणी एसटीचे आगार आहेत. या दोन्ही आगारातून जिल्ह्यातील सात तालुक्यांत बसेस संचालित केल्या जातात. तर भंडारा जिल्ह्याच्या साकोली आगारातून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यात बसेस संचालित केल्या जातात. तिरोडा आगारातून तिरोडा व गोरेगाव या दोन तालुक्यांत तर गोंदिया आगारातून गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी, सडक/अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील काही क्षेत्रांत बसेस संचालित केल्या जातात. एकंदरीत गोंदिया जिल्ह्यात मुख्य बसस्थानके व एसटीच्या आगारांची कमतरता असल्यामुळे बसेस संचालित करणे त्रासदायक ठरत आहे. त्यातच सन २०११ पासून मोरगाव/अर्जुनी, देवरी व आमगाव या तालुक्यातील एसटीच्या आगारांचे प्रस्ताव धूळखात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्हा अद्यापही एसटीच्या वाहतुकीबाबत खूपच कमकुवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एसटीद्वारे संपूर्ण जिल्ह्याचा व्याप होत नाही.गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी आगार व बसस्थानकेनाशिक जिल्ह्यात ३१ बसस्थानके असून १२ वाहतूक नियंत्रण केंद्रे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात नऊ बसस्थानके तर १८ वाहतूक नियंत्रण केंद्रे आहेत. जवळगाव जिल्ह्यात ११ एसटीचे आगार तर २१ बसस्थानके आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १२ आगार तर २६ बसस्थानके आहेत. पुणे जिल्ह्यात १३ आगार व २८ बसस्थानके आहेत. सातारा जिल्ह्यात ११ आगार व ३१ बसस्थानके आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आठ आगार व १० बसस्थानके आहेत. बीड जिल्ह्यात आठ आगार व १५ बसस्थानके आहेत. नागपूर जिल्ह्यात आठ आगार व १२ बसस्थानके आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ आगार व १२ बसस्थानके आहेत. मात्र गोंदिया व भंडारा जिल्हा मिळून केवळ सहा आगार व १० बसस्थानके आहेत. त्यातही केवळ गोंदिया जिल्ह्यात केवळ दोन आगार व पाच बसस्थानके आहेत. त्यातही केवळ तीनच बसस्थानके सुरू असून दोन नवनिर्मित बसस्थानकांचे अद्यापही उद्घाटन झाले नाही. वाहकांंची कमतरताएसटी महामंडळाच्या नियमानुसार प्रत्येक आगारात १.४० टक्के चालक व वाहक जास्त असणे गरजेचे आहे. त्यानुसार गोंदिया आगारात १६२ वाहकांची गरज असतानाही केवळ १३५ वाहक कार्यरत आहेत. त्यातही १० ते १२ वाहक नियमित निलंबितच असतात. त्यामुळे या आगारात २७ वाहकांची कमतरता व नियमित निलंबित असणारे १२ वाहक मिळून एकूण ३९ वाहकांची नियमित कमतरता भासते. तसेच नियमानुसार १६२ चालक असणे गरजेचे असते. शेड्युलनुसार (१.४० टक्के जास्त) गोंदिया आगारात १६२ चालक आहेत. मात्र वाहकांच्या कमतरतेमुळे बसेस संचालित करणे कठिण जाते.लांब पल्ल्यांच्या बसेससन २०१४ मध्ये गोंदिया आगारातून लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे एसटी आगाराच्या उत्पन्नात वाढ होत आहे. यात गोंदिया ते अकोला, गोंदिया ते उमरखेड, गोंदिया ते आर्णीमार्गे नांदेड व गोंदिया ते पुसदमार्गे नांदेड यांचा समावेश आहे. शिवाय याचवर्षी गोंदिया ते तुमसर मार्गे नागपूर बसचा शुभारंभ करण्यात आला आहे. या बसच्या अतिरिक्त तीन फेऱ्या भंडारा आगारातून वाढविण्यातही आल्या आहेत. तसेच सन २०१३ मध्ये गोंदिया ते लोणार, गोंदिया ते यवतमाळ व गोंदिया ते यवतमाळ या लांब पल्ल्यांचे बसेस संचालित करणे सुरू करण्यात आले होते.बसस्थानकाच्या विस्तारासाठी ९० लाखपूर्वी गोंदिया बसस्थानकावर केवळ सहा फलाट होते. मात्र त्यात वाढ करण्यासाठी व स्थानकाला अत्याधुनिक करण्यासाठी ९० लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. त्यातून आता आणखी सात फलाटांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे आता एकूण १३ फलाटांवरून बसेसचे संचालन करणे सुरू झाले आहे. त्यात कँटिग, प्रवासासाठी पासेसचे कार्य, जिल्हा वाहतूक अधिकाऱ्यांचे कक्ष, हिरकणी कक्ष व चालक-वाहकांचे विश्रामगृह तयार करण्यात आले. आता संगणकीय उद्घोषणा पद्धती, गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांवर करडी नजर ठेवण्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, आॅनलाईन आरक्षण प्रणाली, रेल्वेसारखे तिकीट बुकिंग सेंटर देण्याचे कार्य करण्यात येणार आहे. याशिवाय वेबसाईटवरून प्रवाशांना आपल्या घरूनच ई-तिकीट बुकिंग करता येणार आहे. या बुकिंगनंतर मोबाईलवर एक एसएमएस पाठविले जाईल. तो एसएमएस (संदेश) वाहकाला दाखविल्यावर त्या प्रवाशाची तो सोय करून देईल.गोंदिया आगाराला २.५५ कोटींचा नफाएसटी महामंडळाच्या गोंदिया आगाराला सन २०१३ मधील डिसेंबर महिन्यात एक कोटी ७४ लाख नऊ हजार रूपयांचे उत्पन्न झाले होते. तर सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात एक कोटी ९८ लाख ३२ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. तसेच सन २०१३ च्या वर्षभरात गोंदिया आगाराला एकूण १५ कोटी ८३ लाख ७ हजार रूपयांचे उत्पन्न झाले होते. तर, सन २०१४ च्या संपूर्ण वर्षभरात गोंदिया आगाराला एकूण १७ कोटी ५७ लाख ९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. हे सन २०१४ चे उत्पन्न मागील सन २०१३ च्या उत्पन्नापेक्षा तब्बल २.५५ कोटी रूपयांनी वाढले आहे.सन २०११ मध्ये वरिष्ठ कार्यालयाला आगार व बसस्थानकांबाबत विभागीय कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यात आगार व बसस्थानके कुठे गरजेचे झाले आहेत, ते नमूद आहे. आता प्रशासनाकडून जागा व निधी उपलब्ध झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून आगार व बसस्थानकांच्या निर्मितीविषयी कार्यवाही करण्यात येईल.’’-गौतम एन. शेंडे,आगार व्यवस्थापक, गोंदिया