लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा असून हे पाणीे रब्बी पिकासाठी दिल्यास जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी जिल्ह्यातील ३ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना बाघ प्रकल्पाने पाणी दिले होते.याचा गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला होता. दरवर्षी नहराच्या माध्यमातून सिरपूर जलाशयाचे पाणी दिले जाते.मात्र सध्यास्थितीत या प्रकल्पात केवळ २५.७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुजारीटोला, कालीसरार जलाशयात अनुक्रमे केवळ ७०.१० व ६९.४२ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी सिरपूर जलाशयात सोडल्यानंतर सुध्दा रब्बी पिकांसाठी पाणी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या सिरपूर जलाशयाचे पाणी गोंदिया शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती तेव्हा याच जलाशयाची गोंदियावासीयांना मदत झाली होती.नहराच्या दुरुस्तीवर १३० कोटीचा खर्चयावर्षी बाघ प्रकल्पाव्दारे नहरातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नाही. सध्या नहराच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला सुरूवात केली जाणार आहे. हे पाणी रोटेशन पध्दतीने दिले जाणार असून यासंदर्भात नुकतीच पाणी वापर सहकारी संस्थाची नुकतीच एक बैठक पार पडली.- हेमराज छप्परघरे, कार्यकारी अभियंता बाघ व इटियाडोह विभाग, गोंदिया
रब्बीसाठी प्रकल्पाचे पाणी मिळणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 9:57 PM
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्देशेतकरी संकटात : प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा