ऑनलाईन लोकमतसडक अर्जुनी : मुलींनो, क्रांतिज्योती सावित्रीबाईचा त्याग लक्षात ठेवा. माता जिजाऊ व माता रमाईचा त्याग लक्षात घ्या. सावित्रीबाईने सर्व लेकींसाठी जोतिबांच्या बरोबरीने त्यांच्या कार्याला पूर्ण साथ देऊन तमाम स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. आपण खूप शिक्षण घ्या. स्वत:मध्ये निर्भिडपणा येवू द्या व स्वावलंबी जीवन जगा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका प्रा. सविता बेदरकर यांनी केले.लेक शिकवा अभियानाचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शशीकला टेंभुर्णे होत्या. अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्ते मेहजबीन राजानी, मीरा झोडावणे, प्राचार्य ए.वाय. खान, आर.एस. डोये, एम.एन. भौतीक, ए.आर. कुंभीरकर उपस्थित होते.सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. लेक शिकवा अभियानांतर्गत शाळेच्या वतीने डॉ. सविता बेदरकर, मेहजबीन राजानी, मीरा झोडावणे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिथींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच ए.पी. मेश्राम रचित ‘एक सावित्रीची लेक माझ्या शाळेमंदी आली’ ही कविता आचल पंचभाई व ग्रुप यांनी सादर केली. प्रास्ताविक डी.पी. डोंगरवार यांनी मांडले. संचालन अनिल मेश्राम यांनी केले. आभार आर.एस. डोये यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.
मुलींनो, क्रांतिज्योतीचा आदर्श स्वीकारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 10:26 PM
मुलींनो, क्रांतिज्योती सावित्रीबाईचा त्याग लक्षात ठेवा. माता जिजाऊ व माता रमाईचा त्याग लक्षात घ्या. सावित्रीबाईने सर्व लेकींसाठी जोतिबांच्या बरोबरीने त्यांच्या कार्याला पूर्ण साथ देऊन तमाम स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली.
ठळक मुद्देसविता बेदरकर : लेक शिकवा अभियानाचा समारोप