शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:36 PM

आपल्या पुरुष प्रधान देशात आजही मुलींना मुलांपेक्षा कमी दर्जा दिला जातो. मुलांना घराण्यातील वारस व वंशाचा दिवा समजून त्यांना मुलीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. माणूस मेल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी मुलाच्या हस्ते देण्याची रुढी व परंपरा आहे.

ठळक मुद्देसमाजापुढे ठेवला आदर्श : सर्वच कार्य पार पाडले सातही मुलींनी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या पुरुष प्रधान देशात आजही मुलींना मुलांपेक्षा कमी दर्जा दिला जातो. मुलांना घराण्यातील वारस व वंशाचा दिवा समजून त्यांना मुलीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. माणूस मेल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी मुलाच्या हस्ते देण्याची रुढी व परंपरा आहे.परंतु ही रुढी व परंपराना मोडीत गोंदियाचे पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त संचालक तथा क्षत्रीय मराठा कलार समाजाचे जिल्हा अध्यक्ष राहिलेले डॉ.रामनारायण तेजराम साव भोयर (६५) रा. कुडवा रोड यांच्या निधनानंतर गोंदियाच्या पार्वती घाटावर शनिवारी (दि.२६) अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ.भोयर यांच्या पार्थीवाला त्यांच्या सातही मुलींनी एकत्रित अग्नी देऊन समाजापुढे आदर्श ठेवला.शहरातील कुडवा रोड मार्गावर राहणारे पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. रामनारायण तेजराम साव भोयर यांचे शुक्रवारी (दि.२६) सकाळी ९ वाजताच्या सुमारास हद्यविकाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी आपल्या जिवनात मुलगा नसल्याची कसल्याही प्रकारची खंत न बाळगता त्यांनी आपल्या सातही मुलींना उच्च शिक्षण व संस्कार देऊन त्यांचा विवाह करुन दिला. ते १२ वर्ष क्षत्रीय मराठा कलार समाजाचे जिल्हा अध्यक्ष होते.त्यांच्याच कार्यकाळात गोंदिया येथे कलार समाज भवनाचे बांधकाम करण्यात आली.त्यांच्यावर शनिवारी (दि.२७) गोंदिया येथील पार्वती घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारात डॉ. भोयर यांच्या पार्थीव शरीराला त्यांची मुलगी अनिता धपाडे यांच्यासह सातही मुलींनी जुन्या रुढी व परंपराना मोडीत अग्नी देऊन समाजापुढे आदर्श ठेवला.याप्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,नातेवाईक,मित्र मंडळी व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.