मराठा-मुस्लीम समाज : शिक्षक समितीचे मुकाअंना निवेदन गोंदिया : मराठा व मुस्लिम समाजाच्या कर्मचाऱ्यांना व शिक्षकांना त्याच्या पदोन्नती किंवा सरळसेवा भरतीसाठी शासन निर्णयाप्रमाणे लाभ त्वरीत लागू करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या अनुशंगाने समितीच्यावतीने जिल्हा सरचिटणीस एल.यु. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २४ जुलै २०१४ अन्वये शैक्षणिक सामाजिक मागास प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठी १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला विहित करण्यात आले आहे. तसेच शासन निर्णण क्रमांक अधिवि २०१४/प्र.क्र. ८१ का.७ दि. १९/७/२०१४ अन्वये विशेष मागास प्रवर्ग (अ) अंतर्गत अनुसूचित यादीनुसार मुस्लीम समाजातील घटकांसाठी ५ टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाप्रमाणे सर्व सुविधा पुरवण्यिात येईल असे आश्वासन दिले. निवेदन देताना समितीचे एन.बी. बिसेन, जी.व्ही. करकिले. वाय.आर. रहांगडाले, नवनाथ जाधव, सदाशिव जाधव, महेश लोहारे, अन्नाभाऊ खेमवार, शेख सर, सुभाष मेमन उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आरक्षणाप्रमाणे लाभ द्या
By admin | Published: August 21, 2014 11:58 PM