शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

लायसन्स असेल तरच द्या मुलांना गाडी; अन्यथा पालकांना होईल कोर्टाची वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 2:27 PM

बुंगाट 'धूम मचाले' पडेल महागात : कठोर कारवाई, आरटीओ, पोलिस प्रशासनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शहर-जिल्ह्याची वाढलेली लोकसंख्या आणि तेवढ्याच प्रमाणात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ आहे. नुकतीच पुण्यामध्ये नशेत कार चालवल्याने दोघांना जीव गमवावा लागला. या धर्तीवर गोंदिया आरटीओ, पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. १८ वयाच्या आत असलेल्या मुलांच्या हाती गाडीची चावी द्याल तर पालकांवर गुन्हा दाखल होऊन कोर्टाची पायरी चढावी लागेल, असा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे शहरातील कल्याणनगर भागात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने कार चालवून दोघांना उडवल्याने दोघा अभियंत्यांचा हकनाक बळी गेला. गोंदिया शहरातही मिसरुड न फुटलेली तरणी पोरं बाइकच्या अक्सिलेटरचा रेस वाढवून सुसाट वाहन पळवतात. कोणाची तमा न बाळगता वाहन पळवण्यामुळे अपघात घडताहेत. वाहने चालवणारी अल्पवयीन मुले असतील त्यांना कायद्यान्वये दंड तर होताच मात्र अपघातात एखाद्याला जीव गमावला तर संबंधित अल्पवयीन मुलाच्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन गुन्हा दाखल होतो. कारवाई होऊन गुन्हा दाखल होता.

हे प्रकरण न्यायालयात जाऊन कठोर कारवाईही होऊ शकते. पोलिस व आरटीओ प्रशासनाने पुण्याच्या घटनेची दखल घेत पालकांनी सतर्क राहत चुकूनही आपल्या मुलांच्या हाती वाहनाची चावी देऊ नये असे आवाहन केले आहे.

 चार महिन्यांत ८५ जीवघेण्या अपघातात ३७ जणांचा बळीजिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ या गेल्या चार महिन्यांमध्ये विविध प्रकारचे दुचाकीसह चारचाकीचे असे एकूण १८५ अपघात झाले आहेत.बाइकद्वारे झालेल्या जीवघेण्या अपघाताची संख्या ८२ असून, त्यामध्ये ३७ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक आकडेवारी वाहतूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.

बेफिकीरपणे वाहन चालवण्यामुळे अपघातांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात वाहन परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नका अन्यथा त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. नाहक आर्थिक व मानसिक त्रास होतो. यावर सर्वांनीच सतर्क राहावे.- राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,

मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुले बाइक चालवताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. शिवाय गुन्ह्याचे स्वरूप पाहून संबंधित पालकांवर गुन्हे दाखल होऊन कायद्यानुसार शिक्षाही होऊ शकते.- किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण विभाग 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षाgondiya-acगोंदिया