लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहा महिन्यांऐवजी १२ महिन्यांचे नियमित वेतन द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी स्वयंपाकी महिला संघाच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर गुरूवारी (दि.५) मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.स्वयंपाकी महिलांना किमान वेतन कायदा लागू करावा, स्वयंपाकी महिलांना कायम स्वरुपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, महिलांची सेवा कमी करण्यापेक्षा त्यांच्या योग्य कार्यप्रणालीचा वापर करावा, नव्या स्वयंपाकी महिलांची नियुक्ती करण्याचे अधिकार शासन स्तरावर झाले पाहिजे आदि मागण्यांसाठी मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, खासदार व आमदारांना पाठविण्यात आले.आंदोलनात ज्योती लांडगे, चंदा दमाहे, शिवनाथ खरोले, मनोज दमाहे, प्रमिला राऊत, प्रतिभा बडगे, सुनिता पाऊलझगडे, गिता सोनेवाने, भोजराम वाढई, सरिता उके यांच्यासह शेकडो स्वयंपाकी महिला सहभागी झाल्या होत्या.
स्वयंपाकी महिलांना १२ महिन्यांचे वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 10:05 PM
दहा महिन्यांऐवजी १२ महिन्यांचे नियमित वेतन द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी स्वयंपाकी महिला संघाच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर गुरूवारी (दि.५) मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देस्वयंपाकी महिला संघाची मागणी : जिल्हा परिषदेवर मोर्चा व धरणे