लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र कालव्यांत कचरा वाढल्याने पाणी टोकावरील गावापर्यंत पोहचत नसून हातचे पीक निसटते. करिता शेतीला पाणी सोडावे तसेच कालव्याची सफाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.यंदा पाऊस जिल्ह्यावर चांगलाच खूश दिसला. यामुळेच जिल्ह्यातील प्रकल्प व तलावांत चांगला पाणीसाठा आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात एका पाण्याची गरज पिकांना दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या होत्या. मात्र परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून उन्हाच्या तीव्र झळा धानपीकाला लागत आहेत. अशात शेत जमीनीला भेगा पडल्या आहेत.अनेक शेतकरी आजही वरथेंपी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे सिंचन विभागाकडे त्यांच्या नजरा लागल्या असून नवेगावबांध तलावाचे पाणी सोडावे अशी मागणी करीत आहेत. पाच गाव मालकीचा हा नवेगावबांध तलाव आहे. या तलावावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. तलावातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. मात्र कालव्यांची स्थिती चांगली नसल्याने पाणी कित्येक गावांना मिळत नाही.कालव्यांत मोठ्या प्रमाणात कचरा उगवल्याने बाराभाटी, पिंपळगाव व खांबी या गावांना पाणी मिळत नाही. परिणामी हाती आलेले पीक शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी गमवावे लागते.कालव्यांच्या सफाईची गरजआता पाणी वापर संस्थेकडून पाण्याचे वितरण केले जात आहे. अशात मोजूनच पाणी मिळणार असेही दिसते. मात्र तलावातील पाणी सोडले तरिही ते टोकावरच्या गावांपर्यंत पोहचत नाही. कारण, कालवा कचºयाने बरबटला आहे. अशात पाण्याला अडथळा निर्माण होतो व पाणी अडून राहते. त्यामुळे पुरेसे पाणी मिळावे यासाठी कालव्याची सफाई करण्याची मागणीही बाराभाटी, येरंडी, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी, कुंभीटोला गावातील शेतकरी करीत आहेत.
शेतीला पुरेसे पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:45 PM
पावसाने यावर्षी चांगली साथ दिली. मात्र आता पिकांना एका पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. म्हणून आता नवेगावबांध तलावातील पाणी शेतीला सोडावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : एका पाण्याची पिकांना तहान