आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची सरसकट मदत देण्यासह अन्य मागण्या आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जोरकसपणे मांडल्या. मात्र त्यावर विधानसभा अध्यक्षांकडून काहीच ठोस उत्तर दिले जात नसल्याने आमदार अग्रवाल विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले. तसेच कॉंग्रेस आमदारांसह शासन विरोधी नारेबाजी करून सदन दणाणून सोडले.जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांचा एक-एक दिवस किती जड जात आहे याचा अनुभव असल्यामुळे आमदार अग्रवाल यांनी सोमवारी (दि.१८) विधानसभेत शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची सरसकट मदत करा अशी मागणी उचलून धरली. एवढेच नव्हे तर धानाला ५०० रूपये प्रती क्विंटल बोनस, सन २००९ मध्ये कॉंग्रेस सरकारने दिलेल्या सरसकट कर्जमाफी प्रमाणेच राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे आदि मागण्या उचलून धरल्या.शेतकºयांच्या मदतीसाठी असलेल्या या मागण्यांवर सरकारची टोलवाटोलवी व विधानसभा अध्यक्षांकडून काही सकारात्मक उत्तर न मिळाल्याने शेवटी राग अनावर झालेल्या आमदार अग्रवाल यांनी सदनात मागण्यांना पुरजोर पणे उटलून धरले. एवढेच नव्हे तर कॉंग्रेस पक्षाच्या अन्य आमदारांसोबत सरकार विरोधी नारेबाजी करून प्रदर्शन केले.दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मांडलेल्या विषयांवर सरकार काहीच बोलत नसल्याचे बघून सरकारने आपली बाजू मांडून समस्येवर स्थायी तोडगा काढावा अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केली. तसेच कित्येक वर्षे जुन्या आणेवारीच्या नियमांमुळे गोंदिया जिल्ह्याची आणेवारी ५७ टक्के येत आहे. पावसा अभावी जेथे ५० टक्के पेक्षा कमी पेरणी झाली तेथे ५७ टक्के आणेवारी येत असल्याचे दाखविले जात असल्याने यातून सरकार शेतकऱ्यांना मदत देण्याप्रती उदासीन असल्याचे आमदार अग्रवाल म्हणाले.अशात सरकारला पूर्ण जिल्हा दुष्काळ घोषीत करण्यासाठी असलेल्या नियमांत बदल करण्याची गरज असून त्याचा खुलासा करण्याचीही मागणी केली. विधानसभेत झालेल्या या चर्चेत विरोधी पक्ष नेता डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी जलसंपदा मंत्री विजय वडेट्टीवार, माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुनील केदार, आमदार विरेंद्र जगताप, आमदार बाळा काशिवार यांनी भाग घेतला.आमदार अग्रवाल यांच्या या गोंधळामागील गांभीर्य लक्षात घेत अखेर कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील दुष्काळ बघता गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यासाठी सरकारकडून कारवाई केली जात असल्याचे सांगीतले.एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना अपेक्षीत मदत करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांची लवकरच बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांचीही स्थिती जाणून घेऊ असे सांगीतले. अशात जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यासाठी नियमांत बदल करण्याची गरज पडल्यास ते ही केले जाणार व याच सत्रात घोषणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.सरसकट कर्जमाफी, पीकविमा व बोनसचीही मागणीआमदार अग्रवाल यांनी विधानसभेत झालेल्या चर्चेत, सरकारकडून जिल्ह्यातील तीन तालुके मध्यम दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. मात्र मध्यम दुष्काळग्रस्त या तालुक्यातील शेतकऱ्यांना यातून काही ठोस मदत मिळणार नसल्याने पूर्ण गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्त जिल्ह्याला दिल्या जाणाऱ्या सर्व योजना लागू करण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यात सुमारे २ लाख शेतकरी असताना सरकारने त्यापैकी ४६ हजार शेतकऱ्यांना पात्र घोषित केल्याने काही होणार नाही. शेतकऱ्यांना खरी मदत करण्यासाठी सन २००८-०९ कॉंग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशावरून केंद्रातील मनमोहन सिंह सरकारने देशात केलेल्या सरसकट कर्जमाफी प्रमाणेच राज्यातील सर्व शेतकºयांना आता कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली. याशिवाय पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून शुल्क घेण्यात आले. आता लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी पीक विम्याची रक्कम त्वरीत वितरीत करावी. शिवाय शेतकºयांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यांच्या धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस द्यावा अशीही मागणी केली.कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूबशेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवरही सरकारकडून काहीच ठोस उत्तर दिले जात नसल्यामुळे भडकलेले आमदार अग्रवाल व कॉंग्रेस पक्षातील अन्य आमदारांच्या प्रदर्शनामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. यानंतर कामकाजाला सुरूवात झाली. मात्र त्यानंतरही आमदार अग्रवाल यांचा प्रश्नांचा भडीमार संपलेला नव्हता.
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १० हजारांची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:13 PM
जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची सरसकट मदत देण्यासह अन्य मागण्या आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जोरकसपणे मांडल्या.
ठळक मुद्देआमदार अग्रवाल यांची मागणी : विधानसभेत केली सरकारविरोधी नारेबाजी