लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षांत जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.२३) रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते.या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आर. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.बडोले पुढे म्हणाले, रोजगार हमी योजना ही आपल्या राज्याची योजना आहे. मात्र आज आपण या योजनेच्या अंमलबजावणीत माघारलो आहे. तालुका पातळीवर संबंधित यंत्रणांचा या योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका आहे. तालुका पातळीवर तहसीलदाराने यंत्रणांचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी. योजनेच्या कामाचा नियमित आढावा दर महिन्याला घ्यावा. ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना कामे उपलब्ध करु न द्यावे. ग्रामपंचायती व ग्रामस्थांना विश्वासात घेवून रोहयोतून विकास कामे करावी. ज्या मजुरांना मागील कामांची अद्यापर्यंत मंजुरी देण्यात आली नाही, त्यांना ती त्वरित देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा. कुशलच्या कामाची थकीत मंजुरी केंद्र सरकारकडून लवकर उपलब्ध कशी होईल, यासाठी देखील पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. पांदण रस्ते शेतकºयांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जिल्ह्यात रोहयोमधून मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते तयार करण्याचे नियोजन करावे. अनेक गावात अंतर्गत रस्त्यांच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी पंचायत समित्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले. सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, सहायक वनसंरक्षक शेंडे, शेख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व रोहयोचे अधिकारी उपस्थित होते.१३ हजार मजुरांची मजुरी प्रलंबितजिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. निधी उपलब्ध नसला तरी मजूर मोठ्या संख्येने कामावर येत आहे. जिल्ह्यातील ज्या १३ हजार मजुरांची मजुरी प्रलंबित आहे, निधी उपलब्ध होताच ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. ज्या कुटुंबांनी ९० दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे, अशा कुटुंबातील मजुरांना कामगार कल्याण मंडळाचे फायदे मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. जिल्ह्यात २२ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर ८६४ कामे व यंत्रणांची ३९१ कामे अशी एकूण १२५५ कामे सुरु आहेत. यावर ६८ हजार ५२९ मजूर कामावर आहेत.
मजुरांना रोहयोची कामे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:32 AM
मागील वर्षांत जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : विविध यंत्रणांना समन्वय साधण्याचा दिला सल्ला