शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

आयुर्वेदिक दवाखान्याला नियमित डॉक्टर द्या

By admin | Published: August 13, 2016 12:16 AM

येथे जिल्हा परिषदेचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. या दवाखान्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमीत निवड आहे.

एका डॉक्टरकडे दोन दवाखाने : पदभरती नाही, रुग्णांना होतो त्रास बाराभाटी : येथे जिल्हा परिषदेचा आयुर्वेदिक दवाखाना आहे. या दवाखान्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमीत निवड आहे. पण सदर दवाखान्याच्या डॉक्टरांना गोठणगाव दवाखान्याला जावे लागते म्हणून येथील दवाखान्याला नियमीत डॉक्टर द्या अशी रुग्णांची मागणी आहे. येथील दवाखान्याच्या डॉक्टरांना आठवड्यातून अर्धे दिवस गोठणगावचा दवाखाना सांभाळावा लागतो. हे एक डॉक्टर दोन दवाखाने सांभाळत आहेत. गोठणगाव आरोग्य केंद्रात डॉक्टरची दोन पदे असून त्यातील एक पद रिक्त आहे. अनेकदा परिसरातील रुग्ण येथील दवाखान्यात आले असता डॉक्टर गोठणगावला गेले असे परिचराकडून माहिती होते. यामुळे परिसरातील रुग्णांना त्रास होत आहे. करिता येथील दवाखान्याला नियमीत डॉक्टर द्या अशी मागणी बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, कवठा, ब्राम्हणटोला, सुकडी, डोंगरगाव आदी गावातील गावकऱ्यांची आहे. (वार्ताहर) गोठणगाव आरोग्य केंद्राला एक डॉक्टर असून एक पद रिक्त आहे. जे डॉक्टर आहेत हे विविध सभा, मिटींग यांना जात असतात. त्यामुळे बाराभाटीच्या डॉक्टरांना गोठणगावला जावे लागते. ते बाराभाटीला राहतील याचा मी पाठपुरावा करतो. डॉ. विजय राऊत तालुका वैद्यकीय अधिकारी अर्जुनी-मोरगाव.