बोंडगांवदेवी : सामान्य प्रशासन विभागाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत मिळणारे आरक्षण रद्द केले. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या आदेशाविरोधात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (दि.२५) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात कार्याध्यक्ष श्रीकांत जनबंधू, सरचिटणीस प्रवीण गजभिये, संजय डोंगरे, डी. एम. भालाधरी, संजय रामटेके, राजेश गजभिये आदींनी मार्गदर्शन केले. तर वासनिक यांनी, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय रद्द केला नाही तर राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. यावेळी देवदास मेश्राम, आर. के. शहारे, धर्मशील रामटेके, एल. डी. लाडे, एम. एस. शहारे, एच. एम. खांडेकर, एफ. एस. रामटेके, अनिल साखरे, संजय मेश्राम, अरविंद खाडे, एस. डी. मडावी, आर. एम. करडे, एफ. पी. उके, राजेंद्र सांगोडे, भरत वाघमारे, आशिष टेंभुरकर, देवेंद्र चंद्रिकापुरे, अनिल मेश्राम, विनोद रंगारी, सचिन राऊत, डार्विन शेंडे, दिक्षांत धारगावे, सी. के. शहारे, अविनाश गणवीर, प्रदीप रंगारी, मोती समरीत, ए. बी. गडपायले, एन. एच. मेश्राम, एफ. वाय. शहारे, आर. एम. गोस्वामी, एस. डी. सुदामे, एम. एम. चाचेरे, एम. एन. अंबादे, प्रज्ञा रंगारी, यज्ञयाग रामटेके, यू. ए. टेंभुरकर, आनंद डोंगरे, लोकनाथ तितराम, उमा गजभिये, नागेश खांडेकर, जितेंद्र बोरकर, एन. एम. खोब्रागडे, पी. एम. मडावी आदी जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.