घाटकुरोडा ग्रामपंचायतीने वाळूघाटाचा लिलाव करण्यास ग्रामसभेची मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर वाळूघाटाचा लिलाव करण्यात येतो. मान्यताप्राप्त वाळूघाट लिलावात न गेल्यास शासनाच्या महसुलाचे नुकसान होऊ नये, तसेच ग्रामपंचायतीसुद्धा निधी मिळावा या दृष्टिकोनातून संबंधित रेती घाट देण्याची मागणी करीत आहेत. वाळूघाटासाठी निश्चित केलेल्या किमतीने परवाने देण्याचे शासन आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. या अधीन राहून ग्रामपंचायतीस ही वाळू विकण्यास अनुमती असते. त्यामुळे ग्रामपंचायतीला घाट देण्याची मागणी सरपंच भोंगाडे यांनी केली आहे. घाटकुरोडा येथे दोन वाळूघाट आहेत. यापैकी घाट क्रमांक २ चे लिलाव झाले आहे, तर घाट क्रमांक १ हे लिलावात गेले नाही. त्यामुळे वाळू माफिया या घाटातील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करीत आहेत. यात शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे.
निर्धारित दरात ग्रामपंचायतीला वाळूघाट द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:27 AM