गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारत बटालियनची निर्मीती करण्यात आली. या भारत बटालियनच्या राज्य राखीव पोलिस बल गट क्रमाक ०६ धुळे येथिल बी कंपनीचे प्लाटुन क्रमांक २ येथे तैनात पोलीस शिपाई सुरेश वामनराव साळी (४६) याने ६ जानेवारी रोजी मद्यप्राशन करून ड्युटीवर गैरहजर राहीले. दुसऱ्या दिवशी त्यांना जॉब विचारला असता त्याने वरिष्ठांना चक्क धमकी दिली. माझ्या जवळील बंदूक जमा करा अन्यथा आपल्या डोक्यात गोळ्या घालून मी आत्महत्या करील अशी धमकी दिली. त्या पोलीस शिपायाविरूध्द सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया जिल्हांतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र पोलिस कॅम्प पिपरीया येथे पोस्ट सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस शिपाई सुरेश वामनराव साळी (४६) यांची नेमणूक करण्यात आली. ६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता पोलीस शिपाई सुरेश वामनराव साळी बक्कल नंबर २९ हे गैरहजर असल्याने त्यांना वरिष्ठांनी खुलासा सादर करण्यास सांगितले. मला खुलासा का मागितला मागितला म्हणून त्यांना राग आल्याने साळी यांनी आपल्या हातातील बंदुक घेऊन पोलीस उपनिरीक्षक एकनाघ डक यांच्याकडे गेला. माझी रायफल जमा करा नाहीतर रायफलने कॉक करून मी स्वत:चा जीव घेईल अशी धमकी दिली. त्यावेळीही तो मद्यप्राशन केलेला होता. पोलीस उपनिरीक्षक पुनमचद उत्तमसिंग सुलाने (४५) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी आरोपीवर महाराष्ट्र दरूबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे