लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : यावर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचा अभाव आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पिके गमवावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातून खरीपातील नुकसान भरपाई भरुन काढू, असा मानस शेतकऱ्यांचा आहे. त्यासाठी वैनगंगा काठावरील गावांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये मोजकाच पाणी साठा आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे शेतकºयांना रब्बी हंगामात धानाची लागवड न करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. हा नियम केवळ गोंदिया जिल्ह्यातच लागू करण्यात आल्याचे बोलल्या जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता रब्बी हंगाम व उन्हाळी पिकांसाठी धापेवाडा प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदी काठावरील गावांना देण्यात यावे. अशी मागणी चांदोरी खुर्द, सावरा, पिपरिया, अर्जुनी, बिहिरीया, इंदोरा बु. करटी खुर्द, पुजारीटोला, महालगाव, मुरदाडा, बोंडरानी, सालेटोला, कवलेवाडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. खरीपातील पिकांचे पाऊस आणि कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हाती आलेले पीक पावसाअभावी गमवावे लागल्याने शेतकºयावर आर्थिक संकट ओढावले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून उर्वरित पाणी रब्बी आणि उन्हाळी धान पिकांसाठी देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत कवलेवाडा, धादरी, बेलाटी, मुंडीपार, चिरेखनी, बेलाटी या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पात सद्यस्थितीत ३६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ७ मीटर पाणी बाहेर वाहत आहे. महिनाभरात वाहून जाणारे १ लाख १० हजार घन मिटर पाणी अडविणे शक्य आहे. त्यासाठी आतापासून पाणी साठवून ठेवल्यास पाणी टंचाईच्या समस्येवर व शेतकºयांच्या पाणी समस्यावर मात करणे शक्य आहे. शेतकºयांना पाणी दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यास मदत होईल.टप्पा-२ द्वारे सर्व तळ्यात पाणीधापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा-२ ची निर्मिती करण्यात आली आहे. यातून खळंबदा जलाशयात व परिसरातील पाणी देणे शक्य आहे. मात्र कुठल्याही तलावात पाणी सोडले जात नाही. खैरबंदा जलाशयात फक्त पावसाळ्यात आठ दहा दिवस अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले व बंद करण्यात आले. तलाव कोरडे पडले आहेत. ज्या उद्देशाने निर्मिती करण्यात आली तो उद्देश देखील साध्य होत नसल्याचे चित्र आहे.पाणीटंचाईवर मात शक्यरब्बी व उन्हाळी धान पिकासंबंधित धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांना व नदी काठावरील गावांना पाणी दिल्यास विहिरी, बोअरवेल, तळ्याच्या पाणी साठ्यात वाढ होईल. यामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. पावसाळ्यात ३० मि.मी. व उन्हाळ्यात ३५ दलघमी पाणी लागते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन केल्यासपाणीटंचाईच्या समस्येवर मात करुन उन्हाळी पिकांना पाणी देणे उपसा करणे शक्य होईल.
वैनगंगा नदी काठावरील गावांना प्रकल्पाचे पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 9:45 PM
यावर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचा अभाव आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांना हाती आलेले पिके गमवावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातून खरीपातील नुकसान भरपाई भरुन काढू, असा मानस शेतकऱ्यांचा आहे.
ठळक मुद्देशेतकºयांसमोर संकट : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष