लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे. तो उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेलांनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना केली. संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या हितासाठी जगून समाजसेवेतून लोकांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनविले. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून खा. प्रफुल पटेल, संस्थाध्यक्ष वर्षा पटेल व गोंदिया शिक्षण संस्थेने मनोहरभाई पटेलांची स्वप्नपूर्ती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे प्रतिपादन संस्था सचिव राजेंद्र जैन यांनी केले.गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित नटवरला माणिकलाल दलाल महाविद्यालयात मनोहरभाई पटेल अॅकादमी व जीईएस सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क स्पोकन इंग्लिश व संगणक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते मार्गदर्शन करताना बोलत होते.या वेळी प्रामुख्याने प्राचार्य डॉ. रजनी चतुर्वेदी, स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षक डॉ.एस.यू. खान, डॉ. मुनेश ठाकरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. भावेश जसानी उपस्थित होते.प्रास्ताविकातून डॉ. चतुर्वेदी यांनी मनोहरभाई पटेलांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उल्लेख केला. त्यांनी शिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तसेच जीईएस सोशल फोरमचा उद्देश समाजहितासाठी असून संस्थेचे सर्व कर्मचारी समाजसेवा करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.डॉ. खान यांनी, इंग्रजी भाषा ही इतर भाषांपेक्षा सोपी असून आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंग्रजी भाषा रोजगार उपलब्ध करून देण्यास सक्षम असल्याचे सांगितले. तर कंप्यूटर प्रशिक्षक मुनेश ठाकरे यांनी, आय संगणक युग असून आॅनलाईन पद्धतीमुळे वेळ व पैशाची बचत होते, असे सांगितले. तसेच डॉ. जसानी यांनी, जीईएस फोरमच्या माध्यमाने विविध सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व रोजगाराची संधी उपलब्ध करून आत्मनिर्भर व्हावे, असे सांगितले.संचालन डॉ. कपिल चव्हाण यांनी केले. आभार डॉ. जसानी यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. शारदा महाजन, प्रा. राकेश खंडेलवाल, डॉ. दिलीप जेना, डॉ. भूमिका ठाकूर, डॉ. अर्चना जैन, प्रा. संतोष होतचंदानी, प्रा. शशिकांत बिसेन, प्रा. उर्विल पटेल, डॉ. प्रवीणकुमार, डॉ. संजय जगणे, प्रा. तृप्ती पटेल, प्रा. कविता पटेल, प्रा. गीता पटेल, प्रा. रवी रहांगडाले, प्रा. रविंद्र मोहतुरे, प्रा. प्रेम बसेने, प्रा. निलकंठ भेंडारकर, डॉ. कृष्णा मेश्राम, प्रा. नरेश भुरे, प्रा. रत्ना विश्वास तसेच मनोहरभाई पटेल अॅकादमी व जीईएस सोशल फोरमच्या सदस्यांनी सहकार्य केले.
मनोहरभाई पटेलांची स्वप्नपूर्ती करण्याचेच लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 9:58 PM
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला पाहिजे. तो उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी शिक्षणमहर्षी स्व. मनोहरभाई पटेलांनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना केली.
ठळक मुद्देराजेंद्र जैन : ३५० विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश व संगणक प्रशिक्षण