लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लवकरच पाच कोटींच्या निधीतून रावणवाडी रूग्णालयाची इमारत तयार होणार. लवकरच हेल्थ वेलनेस स्कीमच्या माध्यमातून फक्त गोंदिया तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेद्रांत आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होणार. आरोग्य सेवा आपल्या दारी पोहचविण्याचे आमचे लक्ष्य असून ते आता सार्थकी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम काटी येथे आयोजीत आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, गोंदिया तालुका आरोग्य क्षेत्रात मागासलेला होता. मात्र आम्ही रजेगाव व खमारीसह नऊ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरूवात केली. तर रजेगाव ग्रामीण रूग्णालयासाठी शासनाकडून अतिरीक्त १०८ रूग्णवाहिका सेवेला मंजुरी मिळविली आहे. हेल्थ वेलनेस स्कीम ंअंतर्गत चिकीत्सकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना कार्यक्षेत्रातील किमान २० नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करावी लागणार आहे. अशात आरोग्य सेवा खरोखरच आपल्या दारी येणार असल्याचे सांगीतले.पंचायत समिती सदस्य अनिल मते यांनी, गोंदिया तालुक्यात आरोग्य, शिक्षण, कृषी व ग्रामीण क्षेत्रातील विकासाच्या कामातील गती आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांचे फलीत असल्याचे मत व्यक्त केले. शिबिरात वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सतीश जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. खंडाते, जिल्हा परिषद आरोग्य सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, रजनी गौतम, देवेंद्र मानकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, मनिष मेश्राम, गेंदलाल शरणागत, अंकेश हरिणखेडे, आशिष चव्हाण, आनंद तुरकर, अमृत तुरकर, रोहिदास कावरे, मुलचंद देशकर, श्रीराम गुप्ता, निलेश असाटी, सुरेंद्र असाटी, मोहपत खरे, प्रकाश जंभरे, डॉ. देवा जंभरे, केशव मात्रे, लोकचंद दंदरे, सचिन रहांगडाले, डॉ. देवेंद्र रहांगडाले व अन्य उपस्थित होते.
आरोग्य सेवा आपल्या दारी पोहचविण्याचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 9:27 PM
लवकरच पाच कोटींच्या निधीतून रावणवाडी रूग्णालयाची इमारत तयार होणार. लवकरच हेल्थ वेलनेस स्कीमच्या माध्यमातून फक्त गोंदिया तालुक्यातील सर्व ५६ आरोग्य उपकेद्रांत आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होणार.
ठळक मुद्देगोपाल अग्रवाल : रावणवाडी येथील आरोग्य शिबिर