लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरपंचांच्या रास्त मागण्या शासनाला मान्य करण्यास भाग पाडण्याकरीता संपूर्ण राज्यातील सरपंच येत्या काळात विधानसभेचा घेराव करतील. एवढेच नव्हे तर गरज पडल्यास न्याय व हक्कासाठी रस्त्यावरही उतरुन आंदोलन करतील असे प्रतिपादन सरपंच सेवा संघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील यांनी केले.जवळील ग्राम नागरा येथील शिव मंदिरात जिल्हा सरपंच सेवा संघाच्यावतीने सोमवारी (दि.१५) आयोजित जिल्ह्यातील सरपंच- उपसरपंचांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.मेळाव्याला राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील, राज्य उपाध्यक्ष ससेंद्र भगत, जिल्हाध्यक्ष कमल येरणे, सरचिटणीस नितीन टेंभरे, उपाध्यक्ष दिनेश कोरे, महिला उपाध्यक्ष मधू अग्रवाल, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख सदाशिव ढेंगे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रांजल वाघ, सरचिटणीस मनिष फुके, संघटक राजेश पटले, डॉ.जे.टी.रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष येरणे यांनी, सरपंच हे थेट लोकांमधून निवडून आले आहे.अशात कमीत कमी ४० टक्के लोक त्यांच्या बाजूने राहतात. त्यामुळे शासनाने सरपंच व ग्रामपंचायतच्या समस्यांचे निराकरण करावे अन्यथा सर्व सरपंच आपल्या पक्षाचा त्याग करुन तो सरपंच सेवा संघामार्फत निवडणूक लढवेल असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक तालुकाध्यक्ष युनिश रहांगडाले यांनी मांडले. संचालन जिल्हा सरचिटणीस नितीन टेंभरे यांनी केले. आभार जिल्हा महिला प्रतिनिधी राखी ठाकरे यांनी मानले.मेळाव्यासाठी सरपंच सेवा संघाचे गोंदिया तालुकाध्यक्ष मुकेश रहांगडाले, आमगाव तालुकाध्यक्ष सुनिल ब्राम्हणकर, सालेकसा तालुकाध्यक्ष योगेश (संजू) कटरे, महेश भांडारकर, देवरी तालुका प्रतिनिधी विनोद भांडारकर, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष ज्ञानेसर रहांगडाले, मोरगाव अर्जुनी तालुकाध्यक्ष इजि. हेमकृष्ण संग्रामे व गोरेगाव तालुकाध्यक्ष सोमेश रहांगडाले आदिंनी सहकार्य केले.खासदार पटेल यांना दिले निवेदनसरपंच सेवा संघाच्यावतीने सरपंच व ग्रामपंचायतच्या विविध समस्या आणि मागण्यांचे निवेदन खासदार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानानी जाऊन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राज्य अध्यक्ष घोगरे पाटील, राज्य सरचिटणीस पावसे, जिल्हाध्यक्ष कमल येरणे, राज्य उपाध्यक्ष भगत, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख ढेंगे, जिल्हा उपाध्यक्ष कोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.
हक्कासाठी रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:28 AM
सरपंचांच्या रास्त मागण्या शासनाला मान्य करण्यास भाग पाडण्याकरीता संपूर्ण राज्यातील सरपंच येत्या काळात विधानसभेचा घेराव करतील. एवढेच नव्हे तर गरज पडल्यास न्याय व हक्कासाठी रस्त्यावरही उतरुन आंदोलन करतील असे प्रतिपादन सरपंच सेवा संघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील यांनी केले.
ठळक मुद्देपुरुषोत्तम घोगरे पाटील : नागरा येथील सरपंच-उपसरपंचांचा मेळावा