गोंदिया: गोंदियातील रिंगरोड स्थित हनुमाननगर येथील रहिवासी गोलु उर्फ रोहीत हरिप्रसाद तिवारी (वय ३६) तिवारी यांची सोमवारी सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.या घटनेने रेती व्ययसायिकात दहशत निर्माण झाली असून अवंती चौकातील सहयोग रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान शहरातील सहयोग हॉस्पिटल समोर तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. प्राप्त माहितीनुसार गोलू तिवारी हे सोमवारी रात्री दुचाकीने तिरोड़ा येथून गोंदियाकडे येत होते. दरम्यान त्यांच्या पाठीमागे एका दुचाकीवर दोन जणांनी त्यांचा पाठलाग करुन गोळीबार केला. दरम्यान गोलू तिवारी यांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढविला. दरम्यान कुडवा चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका बारसमोर त्यांची दुचाकी स्लिप झाली. आधीच त्यांना गोळी लागली असल्याने आणि दुचाकी स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गोलू तिवारीला उपचारासाठी रिंग रोड परिसरातील सहयोग हॉस्पिटल येथे दाखल केले. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या घटनेची शहरात पसरताच गोलू तिवारी यांच्या मित्रमंडळीनी सहयोग हॉस्पिटल कडे धाव घेतली. दरम्यान परिसरात गर्दी वाढली व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने रुग्णालय परिसरात रामनगर पोलिस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते. रेती घाटाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलल्या जाते. दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी रामनगर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला पण अधिक माहिती देणे टाळले.