लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे मागील तीन चार दिवसांपासून विदर्भात शीत लहर निर्माण झाली आहे. यामुळे तापमानात सातत्याने घट होत असून अनेक वर्षांचे रेकार्ड मोडले जात आहे. रविवारी (दि.३०) गोंदिया येथे मौसमातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील काही जाणकारांच्या मते मागील ३० ते ४० वर्षांतील हे सर्वात कमी तापमान असून आजपर्यंत ऐवढी थंडी कधी पाहिली नव्हती असे बोलले जात आहे. दरमान थंडीमुळे जिल्हाच गारठल्याचे चित्र असून सायंकाळी ६ वाजतानंतर रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.मागील दोन दिवसांपासून पारा सरासरीच्या खाली घसरल्याने थंडीत कमालीची वाढ झाली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्याने हुडहुडी भरत आहे. रात्रीच्या वेळी तापमान प्रचंड घटत असल्याने कमालीची थंडी वाढली आहे. शनिवारी (दि.२९) गोंदिया येथे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ रविवारी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे कडाक्याची थंडी पडली आहे. रविवारी सकाळपासून थंड वारा वाहत होता. त्यामुळे दिवसाचे तापमानही खाली आले होते. रविवारी दिवसभर कडक उन्ह असतानाही थंडी जाणवत होती. रात्रीच्या वेळी या थंडीत प्रचंड वाढ झाली. रविवारी गोंदिया येथे ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.हे या मौसमातील सर्वात कमी तापमान असल्याने हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर मागील वीस ते पंचविस वर्षाच्या तापमान पाहिले असता गोंदिया येथे प्रथमच ऐवढ्या कमी तापमानाची नोंद झालेली नाही. हुडहुडी भरणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण उबदार कपडे घालत आहे. शहरापासून ते ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्य आहे.दिवसभर शेकोटीचा आधार घेत अनेक जण दिसत होते. सायंकाळी थंडीत वाढ झाल्याने रस्त्यावरही शुकशुकाट निर्माण झाला होता. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारीपर्यंत विदर्भात शीत लहर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. या थंडीचा मनुष्यासोबतच प्राणीमात्रांवरही परिणाम होत आहे. अनेक पक्षी या थंडीमुळे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उघड्यावर झोपणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. उब मिळविण्यासाठी शेकट्यांचा आधार घेत आहे. ही थंडी आणखी काही दिवस राहणार असल्याने अनेकांनी याचा धसका घेतला आहे.सामाजिक संस्थाचा पुढाकारमागील तीन चार दिवसांपासून थंडीत प्रचंड वाढ झाल्याने उघड्यावर वास्तव्य करणाऱ्यांचे हाल झाले आहे. तर शहरातील काही सामाजिक संघटनानी उघड्यावर व रेल्वे स्थानकाबाहेर झोपणाऱ्या लोकांना ब्लॅकेंटचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
गोंदिया @ ५.२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:33 PM
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे मागील तीन चार दिवसांपासून विदर्भात शीत लहर निर्माण झाली आहे. यामुळे तापमानात सातत्याने घट होत असून अनेक वर्षांचे रेकार्ड मोडले जात आहे. रविवारी (दि.३०) गोंदिया येथे मौसमातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
ठळक मुद्देमौसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद : दैनदिन कामावर परिणाम